दिघा येथील इलठणपाडा परिसरात ब्रिटिशकालीन दगडी धरणातील पाणी टँकरद्वारे नवी मुंबईकरांना मिळणार आहे. रेल्वेच्या वापरासाठी या धरणातील पाणी वापरण्यात येत होते. मध्यंतरी रेल्वेने या पाण्याचा वापर बंद केला. त्यामुळे धरणाकडे दुर्लक्ष झाले. डागडुजी करण्यात आलेल्या भिंतीतून पाणी पाझरण्यास सुरुवात झाली. सध्या पाण्याची टंचाई पाहता हे पाणी नवी मुंबईकरांना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि खासदार राजन विचारे यांनी रेल्वेशी पत्रव्यवहार केला. यावर रेल्वेने तीन महिन्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली. दुर्लक्ष झाल्याने पाणथळाच्या भिंती वा धरणात गाळ असल्याने पाण्याची पातळी किती आहे, याचा अंदाज येणे कठीण आहे. त्यामुळे धरणातील पाणी किती दिवस पुरेल, याचा अंदाज लावता येणे कठीण आहे. धरणातील पाणी अशुद्ध असल्याने त्याच्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे, असे नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले.
सध्या या धरणातील पाण्याचा वापर आजूबाजूचे आदिवासी आणि झोपडपट्टीतील नागरिक कपडे धुण्यासाठी करतात. तबेल्यातील म्हशींना येथे स्नान घातले जाते. त्यांना अटकाव करणे गरजेचे आहे. यासाठी कृतिआराखडा हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५० दशलक्ष लिटर..
ब्रिटिश अधिकारी हिल्टन यांनी धरणासाठी जागा शोधली. भारतीय रेल्वेच्या उभारणीत ठाणे रेल्वे स्थानक बांधताना हे ५० दशलक्ष लिटर क्षमतेचे ४० फूट खोल धरण २० एकर परिसरात बांधले.

५० दशलक्ष लिटर..
ब्रिटिश अधिकारी हिल्टन यांनी धरणासाठी जागा शोधली. भारतीय रेल्वेच्या उभारणीत ठाणे रेल्वे स्थानक बांधताना हे ५० दशलक्ष लिटर क्षमतेचे ४० फूट खोल धरण २० एकर परिसरात बांधले.