Navi Mumbai Girl Murder Update : २२ वर्षीय तरुणीची उरणच्या कोटनाका येथे निर्घृण हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असून या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळील निर्जन स्थळी अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी टाइम्स ऑफ इंडिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते म्हणाले, मृत पीडित ही कॉमर्स ग्रॅज्युएट असून ती बेलापूर येथील एका खासगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती. गुरुवारी सकाळी मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून ती घरातून निघून गेली. परंतु, रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. (Navi Mumbai Girl Murder)

हेही वाचा >> Navi Mumbai Girl Murder : उरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; पोलीस म्हणाले, “२०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी…”

शुक्रवारी रात्री कोटनाका येथे एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असून भटके कुत्र्यांनी तिच्या मृतदेहाचे लचके तोडले असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्यातील तपास शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना (Navi Mumbai Girl Murder) मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस अधिकारीही घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यावेळी त्यांना भटके कुत्रे तिच्या शरीराचे लचके तोडत असल्याने तिचा चेहरा विद्रुप झाल्याचं आढळलं. कुत्र्यांनी तिच्या खांद्याचे मांसही खालले होते. कमरेवर, पाठीवर आणि गुप्तांगावर चाकूचे वार होते. तिची ओळख पटवण्याकरता तिच्या पालकांना बोलावण्यात आले. तिच्या कपड्यांवरून आणि कमरेवरील टॅटूवरून तिची ओळख पटवली गेली.

पोलीस म्हणाले, पीडित मुलीच्या पालकांनी जावेद शेख याच्यावर आरोप (Navi Mumbai Girl Murder) केला आहे. २०१९ साली यशश्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या पालकांनी जावेद शेखविरोधात पोलीस तक्रार केली होती. या तक्रारीवरून जावेद शेखविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल होऊन दीर्घकाळ तुरुंगवास झाला होता.

यशश्री शिंदेच्या कुटुंबाने काय मागणी केली आहे?

“यशश्रीला दाऊद सातत्याने सतवत होता. ती वडिलांकडे तक्रार करायची, यशश्रीच्या वडिलांनी त्याला ताकीदही दिली होती. मात्र त्याने ऐकलं नाही. तो सातत्याने तिला मेसेज करायचा, तिला त्रास देत होता. त्याने तिला ज्या पद्धतीने मारलं ( Girl Murder ) त्यानंतर आमची एकच मागणी आहे की त्या दाऊदला लवकरात लवकर फाशी द्या.” यशश्रीचा भाऊ म्हणाला, “माझ्या बहिणीला जो त्रास झाला तसंच तिच्याबरोबर जे घडलं त्यानंतर आमची सरकारला ही विनंती आहे की दाऊदला फाशी झाली पाहिजे. इतर कुठल्या घरात असा प्रसंग होऊ नये यासाठी आम्ही हे आवाहन सरकारला करत आहोत” असं यशश्रीच्या भावाने म्हटलं आहे. “आरोपीवर लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे” असं यशश्रीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai girl murder yashashree shindes body were nibbling by stray dogs sgk