नवी मुंबई : दोन महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांतून निवडणूक लढवू पाहणाऱ्या राजकीय नेतेमंडळींच्या फलकांमुळे नवी मुंबई शहर विद्रूप झाल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या नावाखाली स्वयंघोषित ‘भावी आमदारां’नी शहरभर लावलेल्या फलकांवर नागरिकही नाराजी व्यक्त करत आहेत. या बेकायदा फलकबाजीवर कारवाई केल्याचा दावा करत पालिकेने २३ जणांना नोटिसा बजावल्याचे म्हटले आहे.

गणेशोत्सवातील बेकायदा फलकबाजीला आवर घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने उत्सव सुरू होण्यापूर्वीच नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम २४४ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका आकाश-चिन्हे जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण २०२२ नुसार महापालिकेची आगाऊ लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच या परवानगीविना फलकबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार साहाय्यक पालिका आयुक्त तसेच विभाग अधिकाऱ्यांना बहाल केले होते, परंतु सध्या शहरभर जागा मिळेल तेथे लावण्यात आलेल्या फलकांकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नसल्याचे चित्र दिसत आहे.

taloja deepak fertilizers company
पनवेल : तळोजातील दीपक फर्टीलायझर कंपनीत चोरांना रंगेहाथ पकडले 
Onion prices fall , Navi Mumbai Onion, Onion prices ,
नवी मुंबई : कांद्याच्या दरात घसरण
Mora port, Signature campaign, Mora port news,
मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम
Flamingo habitat Navi Mumbai, DPS pond ,
नवी मुंबईतील फ्लेमिंगोचा अधिवास संरक्षित होणार? डीएपीएस तलावात पाण्याच्या प्रवाहावर शिक्कामोर्तब
56 people rescued due to JNPA vigilance
जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले; बचावकार्यात पायलट बोटीची महत्त्वाची भूमिका
CIDCO Exhibition, Vashi CIDCO Exhibition,
नवी मुंबई : चटण्यांपासून चित्रांपर्यंत ‘सरस’ रेलचेल
Salt water agriculture Uran , farmers Uran,
खाऱ्या पाण्यामुळे शेती नापिकीच्या मार्गावर, उरणमधील दोन हजार हेक्टर जमीन समुद्राच्या भरतीमुळे धोक्यात ?
Navi Mumbai Foreign Birds , Uran , Panvel Bay Shore,
नवी मुंबई : पाणथळींना विदेशी पाहुण्यांचा साज, उद्योगपती, बिल्डरांचा डोळा असलेल्या पाणथळींवर पक्ष्यांचा बहर
4 new Cemetery in panvel
चार नवीन स्मशानभूमींसाठी पनवेल महापालिकेचा १० कोटींचा निधी

हेही वाचा – Panvel to Thane Local train: पनवेल-ठाणे लोकल सेवा विस्कळीत, नवी मुंबईच्या नेरूळ स्थानकावर ओव्हर हेड वायरमध्ये समस्या

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याताच सणासुदीचा कालावधी सुरू होताच, आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाकडून नागरिकांशी संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

याचाच एक भाग म्हणून शहरात जागोजागी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. या फलकबाजीतही चढाओढ दिसत असून एका नेत्याचे फलक एखाद्या ठिकाणी लागताच त्याशेजारीच प्रतिस्पर्धी आव्हानवीराचे फलक लावण्यात येत आहेत. या स्पर्धेमुळे महत्त्वाचे चौक, रस्ते आदी ठिकाणे येथे फलकांच्या भिंती शहर विद्रूप करत आहेत.

उरणमध्येही संभाव्य उमेदवारांचा प्रचार

उरण : नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सणाच्या काळात जमा होणाऱ्या शेकडो नागरिकांपर्यंत आपला प्रचार करता यावा यासाठी इच्छुकांनी गणेशोत्सवानिमित्ताने प्रचाराला सुरुवात केली आहे. यामध्ये सार्वजनिक मंडळांना जाहिराती देऊन त्याच्या कमानी शहरात उभारण्यात आल्या आहेत, तर काहींनी गणेशोत्सवातील आरतीच्या पुस्तकांचे वाटप केले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने याची संधी घेण्यासाठी इच्छुक उमेदवार सरसावले आहेत. सध्या दहा-बारा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सव काळातही प्रचार सुरू केला आहे. निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर फलक झळकावता येणार नसल्याने गणेशोत्सव काळाची संधी घेत इच्छुकांनी मंडळांच्या मंडपात कमानी उभारल्या आहेत. मुख्य नाके, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणीही फलक लावून या परिसराचे विद्रूपीकरण केले आहे.

प्रत्येक पक्षात फलकवीर

ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदारसंघांतून लढण्यासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची रांग लागली आहे. भाजपमधून गणेश नाईक, संदीप नाईक, मंदा म्हात्रे, शिवसेना शिंदे गटातून विजय चौगुले, विजय नाहटा, शिवसेना ठाकरे गटातून एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून मंगेश आमले, काँग्रेसमधून अनिकेत म्हात्रे अशा नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत फलकबाजीला ऊत आला आहे.

हेही वाचा – VIDEO : अबब..! आठ फुटी अजगर… तक्रारदारप्रमाणे धडकला पोलीस ठाण्यात, एकच धावपळ

नवी मुंबई शहरात बेकायदा फलकबाजीवर दररोज कारवाई करण्यात येत आहे. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने फलक लावले जात आहेत. त्यामुळे आता फलक तयार करणाऱ्या मुद्रण व्यावसायिकांवरच कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत २३ फलक व्यावसायिकांना अतिक्रमण विभागामार्फत नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे यापुढे जो फलक बनवायचा आहे. त्याच्या परवानगीची प्रत दिल्याशिवाय फलकच छापला जाणार नाही. – डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

Story img Loader