नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील बेलापूर विभागात शहाबाज गावात शनिवारी इंदिरा निवास ही बेकायदा अनधिकृत इमारत कोसळून शनिवारी झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा बळी गेला. याच इमारतीच्या विकासकाने दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या काही अंतरावरच बेकायदा ७ गाळे उभारले होते त्याच्यावरही पालिकेने तोडक कारवाई केली असून दुसरीकडे या इमारतीचा विकासक महेश कुंभार व जागा मालक शरद वाघमारे दोघेही फरार असून एनआरआय पोलीस मागील तीन दिवसापासून त्यांचा शोध घेत आहेत.

शनिवारी नवी मुंबईतील शहाबाज गावात दुर्घटना झालेल्या इमारतीत मधील ५२ जण सुखरूप बाहेर पडले तर ३ जणांचा मृत्यू झाला होता. सलग तिसऱ्या दिवशीही सकाळपासूनच महापालिकेमार्फत दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मलबा हटवण्याचे काम महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणात सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत अनेकांचा संसार ढिगाऱ्याखाली गेल्यामुळे दुर्घटनाग्रस्त नागरिक दररोज घटनास्थळी उपस्थित राहून आपली कागदपत्रे मिळतील या आशेने उपस्थित राहत आहेत. नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाच्या मदतीने मलबा बाहेर काढण्याचे काम करण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त अनेक नागरिकांनी आपल्या नातेवाईकांच्या तसेच नवी मुंबई महापालिकेच्या रात्र बेलापूर येथील निवारा केंद्रात आसरा घेतला आहे.

worker dies after falling from terrace case registered against contractor for negligence
गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
dharashiv three killed in attack marathi news
Dharashiv Crime News : शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून हाणामारी; तिघांचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
Three soldiers killed in Bandipora
बांदीपोरामध्ये तीन जवानांचा मृत्यू; लष्कराच्या वाहनाला अपघात; दोन जखमी
Policeman killed in Navi Mumbai crime news
नवी मुंबईत पोलिसाची हत्या, मृतदेह ट्रॅकवर फेकला..

हेही वाचा…खारघरमध्ये सराफाच्या दुकानात शिरुन लूट

दुसरीकडे शनिवारी घडलेल्या दुर्घटनेत बेकायदा इमारतीचा विकासक महेश कुंभार व जमीन मालक यांच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी याच दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारीच गुन्हा दाखल झालेल्या विकासकाने ७ बेकायदा गाळे बांधले होते त्याच्यावरही पालिकेने रविवारी तोडक कारवाई केली आहे. परंतू या घटनेतील विकासक व जागा मालक फरार झाल्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शहाबाज गावातील दुर्घटनेतील चार मजली इमारत अनधिकृत असून इमारतीला महापालिकेच्या वतीने २००९ मध्येच नोटीस बजावण्यात आली होती . याच दुर्घटनाग्रस्त इमारतीचा विकासक व जमीन मालक याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकासकाने ७ बेकायदा व्यवसायिक गाळे उभारले होते त्याच्यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरु आहे.– शशिकांत तांडेल, अतिरिक्त आयुक्त, बेलापूर विभाग

हेही वाचा…Navi Mumbai Girl Murder : उरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; पोलीस म्हणाले, “२०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी…”

शहाबाज गावातील इमारत दुर्घटना प्रकरणात विकासक व जागा मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून ते दोघेही फरार असून त्यांचा शोध पोलीसांमार्फत घेण्यात येत आहे. – सतीश कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,एनआरआय पोलीस स्टेशन

Story img Loader