अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात होणारे गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन संध्याकाळ पासून सुरू झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २० पोलीस ठाणी असून यंदा सर्वच ठिकाणी गणपती विराजमान झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विसर्जना नंतर उरण पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर स्वछता मोहीम ; दोन टेम्पो कचरा केला गोळा

गणेश विसर्जन साठी होणारी गर्दी मिरवणुका पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडत उत्साहावर विरजण पडू नये म्हणून पोलीस अहोरात्र जागता पहारा देतात. यात त्यांच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन एक दिवस उशिरा केले जाते. करोनावर नियंत्रण मिळाल्याने दोन वर्षांनी मोकळा श्वास घेत गणपती सण आणि शेवटी विसर्जन मिरवणूचा जसा मनमुराद आनंद सामान्य जणांनी लुटला अगदी त्याच प्रमाणे पोलिसांनीही लुटला. नेहमी गणवेशात दिसणारे पोलीस अधिकारी कर्मचारी या वेळी भारतीय पारंपरिक वेशात वावरत होते. विशेष म्हणजे पोलिसी शिस्त असली तरीही वरिष्ठ कनिष्ठ हा भेद दिसत नव्हता सर्वच जण मित्रांप्रमाणे हसून खेळून मिरवणुकीचा आनंद लुटताना दिसत होते. बँड ढोल ताशासह सजवलेल्या वाहनातून गणपती बाप्पाची मिरवणूक विसर्जन स्थळाकडे रवाना होत होती. यातील खारघर पोलिसांनी तर केलेली रथाची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.