नवी मुंबई : मागील दोन वर्षांपासून लसणाची लागवड कमी आहे त्याचबरोबर उत्पादनही कमी आहे. त्यामुळे बाजारात कमी आवक होत आहे, परिणामी आवक कमी असल्याने दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो १५०-३०० रुपयांवर असलेले लसूण आता २००-४०० रुपयांवर पोहोचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील गावरान तसेच परराज्यातील लसणाच्या लागवडीत गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. तसेच मागील वर्षीही लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा नवीन लसूण विक्रीसाठी बाहेर काढला होता. त्यामुळे यंदा लसणाची साठवणूक केलेली नाही. त्यामुळे यंदा साठवणुकीचा लसूण कमी आहे. आजमितीला राज्यातील सर्वच बाजार आवारात परराज्यातील आवक घटली आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात मागील काही दिवसांपासून ९ ते १२ गाड्या आवक होत असून सोमवारी १५ गाड्या मिळून एकूण ३९१७ गोण्या लसूण आवक झाली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत आहे. सध्या मध्यप्रदेशमधील लासणाची आवक होत असून पुढील कालावधीत लसूण आणखी महाग होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वाभूमीवर दहीहंडी उत्सवाला आर्थिक पाठबळ, दहीहंडीसाठी वाहतूक बदल

हेही वाचा – नवी मुंबईत आता पर्यटन विकास आराखडा

लसणाचे उत्पादन मागील काही वर्षांपासून कमी आहे. लागवड कमी असल्याने उत्पादन कमी आहे. मागील वर्षी दराने उच्चांक गाठला होता त्यामुळे बहुतांश लसूण तेव्हा विक्रीसाठी बाहेर काढला होता त्यामुळे यंदा साठवणूक कमी आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने दरात तेजी आहे. – महेश राऊत, घाऊक व्यापारी, कांदा बटाटा बाजार एपीएमसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai increase in the price of garlic 400 per kg in the wholesale market ssb