पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी मागील दोन वर्षांपासून आंदोलन आणि पाठपुरावा सुरू आहे. सोमवारी पनवेलमधील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या अनेक सदस्यांनी केंद्रात व राज्य सरकारकडे अजून पाठपुरावा करणे आवश्यक असताना आंदोलनाची भूमिका घेणे आतेताईपणाचे ठरेल असे मत आल्याने तुर्तास कोकण भवन येथे केले जाणारे धरणे आंदोलनाची भूमिका कृती समितीने स्थगीत केल्याची माहिती या कृती समितीचे अध्यक्ष दथरथ पाटील यांनी लोकसत्ताला दिली. मात्र १५ दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यंसोबत संवाद साधून त्यामधून प्रस्तावातील त्रुटी दूर करुन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठकीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा निवडावा लागेल असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : ४ दिवसांत १७ लाखांचे उत्पन्न; नवी मुंबई मेट्रोमधून पहिल्या चार दिवसांत ५२ हजार प्रवाशांची गारेगार सफर

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Due to low response to half marathon police are forced to fill 300 applications and focus on ticket sales affecting law and order
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
Transport Minister Pratap Sarnaik said private passenger transport providers like Ola Uber Rapido brought under one regulation
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Malad Mith Chowki flyover , traffic,
मुंबई : मालाड मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी अनेक आंदोलने आगरी, कोळी समाजाच्या विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केली. या दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले. मात्र महायुतीचे तीन राजकीय पक्षांचे सरकार राज्यात सत्तेत असताना नामकरणाच्या प्रस्तावामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणासंदर्भात आगरी समाजाचे प्रबोधन करण्याचा कृती समितीने घेतला. या बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खा. रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खा. जगन्नाथ पाटील तसेच संतोष केणे, गुलाब वझे, राजेश गायकर, अतुल पाटील, विजय गायकर, विनोद म्हात्रे, रूपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजाराम पाटील, दीपक म्हात्रे, नंदराज मुंगाजी, दीपक पाटील, सूर्यकांत मढवी, प्रताप पाटील, रघुनाथ पाटील, अनिल कटेकर, दिलीप तांडेल, दीपक म्हात्रे, डी.बी. पाटील, कृष्णा भगत आदी उपस्थित होते.

हेही वाचा : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे पडले महागात; जेष्ठ नागरिकांनो सांभाळून चला… 

या वेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव देण्यास उशीर होत असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. शासनाकडून पाठवलेल्या प्रस्तावात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचे ठरले. या वेळी मराठा आरक्षणाबाबतही चर्चा झाली. मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण शासनाने ओबीसी कोट्यामधून त्यांना आरक्षण देऊ नये, यावर समितीमधील सदस्यांचे एकमत झाले. या संदर्भात आगरी समाजात प्रबोधन करण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बैठका घेण्याचे ठरले.

हेही वाचा : उरणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा विकास नक्की कोण करणार

“मी स्वत: दि. बांच्या नामकरणाच्या प्रस्तावामध्ये नेमक्या त्रुटी काय आहेत याविषयी राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात याविषयीचा पाठपुरावा करणारे केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली. दोन्ही सरकारमध्ये यापुढे संवाद साधून प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दोघांनीही दिले. याविषयी केंद्रीयमंत्री कपिल पाटील हे १५ दिवसांनी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन केंद्राच्या केबीनेटमध्ये हा प्रस्ताव कसा घेतला जाईल यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. केंद्रीय व मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर आपण त्यामध्ये आंदोलनाचा आतताईपणा करावा असे मला स्वत:ला वाटत नसल्याने अजून १५ दिवस सर्वपक्षीय बैठक आयोजित करुन केंद्रीयमंत्री पाटील यांनी नेमका काय पाठपुरावा केला यावर चर्चा केली जाईल. सातत्याने उणीव आढळल्यास आम्हाला कोकण भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पर्याय नाईलाजास्तव निवडावा लागणार आहे.” – दशरथ पाटील, अध्यक्ष, दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती

Story img Loader