पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी मागील दोन वर्षांपासून आंदोलन आणि पाठपुरावा सुरू आहे. सोमवारी पनवेलमधील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या अनेक सदस्यांनी केंद्रात व राज्य सरकारकडे अजून पाठपुरावा करणे आवश्यक असताना आंदोलनाची भूमिका घेणे आतेताईपणाचे ठरेल असे मत आल्याने तुर्तास कोकण भवन येथे केले जाणारे धरणे आंदोलनाची भूमिका कृती समितीने स्थगीत केल्याची माहिती या कृती समितीचे अध्यक्ष दथरथ पाटील यांनी लोकसत्ताला दिली. मात्र १५ दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यंसोबत संवाद साधून त्यामधून प्रस्तावातील त्रुटी दूर करुन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठकीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा निवडावा लागेल असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा