नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थां सदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून जिल्ह्यातील नवी मुंबई शहराला अमली पदार्थांचा विळखा बसला आहे. या वर्षभरात अमली पदार्थांची ६५४ प्रकरणे समोर आली आहेत. २०२३ मध्ये अमली पदार्थांच्या गुन्ह्याचे प्रमाण ४७५ इतके होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते. यावर्षी अमली पदार्थ संबंधातील गुन्ह्यांमध्ये ५८ विदेशी नागरिकांना अटक झाली. यातील बहुतांश आफ्रिकेतील आहेत.

रेव्ह पार्ट्या किंवा इतर तस्करीच्या माध्यमातून अमली पदार्थ तरुण-तरुणींपर्यंत पोहचविले जातात. त्यामुळे या अमली पदार्थांच्या विळख्यात सर्वसामान्य घरामधील तरुण-तरुणी बळी पडत आहेत. नवी मुंबई शहरामध्ये यावर्षी अमली पदार्थ संदर्भात ६५४नोंद झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांपैकी कोकेन हे सर्वाधिक किमतीचे आहे. यावर्षी १६ कोटी ७० लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून, २०२३ मध्ये एक कोटी २५ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले होते. तर १२ कोटी ६७ लाख रुपयांचे मफेड्राॅन जप्त करण्यात आले आहे.

Tunic Worn by Alexander the Great
Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; त्याचा भारताशी काय संबंध?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
भूसंपादनाअभावी रखडलेल्या स्पाइन रस्त्याचे काम प्रगतिपथावर; ‘या’ चार महामार्गाला जोडणार रस्ता
Pimpri Chinchwad Municipal Corporation Tax Assessment and Tax Collection Department is not distributing payments to property owners Pune news
पिंपरी: बिल भरा, विलंब दंड टाळाच्या ‘एसएमएस’चा मोबाईलवर भडीमार, पण…
salman khan shahrukh khan
सलमानपाठोपाठ शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी, ५० लाखांच्या खंडणीची मागणी!
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

हेही वाचा >>>Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन

गांजा आणि ब्राऊन शुगर जप्तीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ६७ लाख ८३ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तर जप्त ब्राऊन शुगरची किंमत ३० लाख १० हजार रुपये आहे. एलएसडी पेपरच्या तुकडेही पोलिसांनी जप्त केले. त्याची किमंत ३३ लाख ५५ लाख रुपयांचे जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मद्याची एकूण किंमत ३३ कोटी २७ लाख रुपये आहे. तर गेल्यावर्षी याचे प्रमाण २२ कोटी ९७ लाख रुपये इतके होते. २०२४ मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये ९३९ जणांना अटक झाली. तर गेल्यावर्षी ८११ जणांना अटक झाली होती. यावर्षी अटकेत असलेल्यांपैकी ५८ जण विदेशी नागरिक आहेत. यातील सर्वाधिक आफ्रिकेतील आहेत. तर २०२३ मध्ये ३७ विदेशी नागरिकांना अटक झाली होती.

हेही वाचा >>>फेब्रुवारीपासून जेएनपीए ते गेट वे अवघ्या २५ मिनिटांत; उरणकरांसाठी जलद प्रवास सुविधा

कोकेन सर्वाधिक

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांपैकी कोकेन हे सर्वाधिक किमतीचे आहे. यावर्षी १६ कोटी ७० लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून, २०२३ मध्ये एक कोटी २५ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले होते. तर १२ कोटी ६७ लाख रुपयांचे मफेड्राॅन जप्त करण्यात आले आहे.

Story img Loader