मोठं मोठ्या टक्केवारीचे आमिष दाखवून कोणी गुंतवणूक करत असाल तर सावधान असावे त्यांच्या आमिषाला बळी पडू शकतात. अशाच प्रकारे गुंतवणुकीवर ३० ते ५० टक्के परताव्याचे आमिष दाखवून नवी मुंबईतील एका व्यक्तीची तब्बल १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील फिर्यादी व आरोपी एकदाही आमने सामने भेटले नाहीत. नवी मुंबईत राहणारे कपिल शहा यांना ७ डिसेंबर रोजी व्हाट्स अप वर एक संदेश आला. त्यानुसार गुंतवणुकीचे चांगली संधी असून एका दिवसातच ३० ते ५० टक्के परतवा मिळू शकतो असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी टेलिग्राम ऍप मोबाईल मध्ये लोड करून त्या लिंक वरून गुतंवणूक करावी लागते असे सांगण्यात आले होते. शहा यांनी मोबाईल वर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे करत गेले. यात त्यांनी स्वतःचा इ मेल आयडी दिला तसेच क्रिप्टोग्लोब वर शहा यांचे खाते बनवण्यात आले. त्याची लिंक शहा यांना पाठवण्यात आली.
नवी मुंबई: एका दिवसात ३० ते ५० टक्के परतावा… जास्त परताव्याच्या आमिषापोटी १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक
सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तीन अनोळखी लोकांवर आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-01-2024 at 16:56 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai man cheated of rs 18 lakh 90 thousand by luring high return zws