नवी मुंबई : ऐरोलीत राहणाऱ्या एका व्यक्तीने कपडे धुण्याची मशीन विक्री करण्यासाठी ओएलएक्स या ऍप वर टाकले होते. सदर मशीन घेण्याची तयारी एका व्यक्तीने दर्शिवली त्याचे पैसेही पाठवण्यासाठी मशीन मालकांच्या बँक आणि क्रेडिट कार्डची माहिती घेतली आणि या माहितीचा गैर फायदा घेत मशीन मालकांच्या खात्यातील तब्बल दोन लाख सात हजार ७८ रुपये स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. याबाबत तक्रार आल्यावर राबले पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सायबर सेल करीत आहे. 

भास्कर कुमार असे यातील फिर्यादीचे नाव असून त्यांचे घरातील कपडे धुण्याचे मशीन विकायचे होते. यासाठी त्यांनी ओ एल एक्स वर मशीनचे फोटो आणि अन्य माहिती दिली. त्यावरून स्वतःचे नाव राहुल शर्मा असे सांगणाऱ्या व्यक्तीने भास्कर यांच्याशी संपर्क करून मशीन घेण्याची तयारी दर्शिवली. मशीनची किंमत १२ हजार ठरली. अगोदर ऑन लाईन पैसे देतो आणि वेळेनुसार मशीन घेऊन जातो असे शर्मा याने सांगितले. त्यानुसार भास्कर यांच्या कडे त्यांच्या बँकेची माहिती मागितली. त्यानुसार त्यांनी बँकेची माहिती दिली.

500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mumbai police busts gang printing and selling fake Indian currency notes
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
mind reading machine china
मनकवडं मशीन अवतरलं, फायदा होणार की गडबड?
Kia Syros Bookings Start Tonight
Kia Syros : थ्री इंजिन पर्याय, ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स अन् बरेच काही; टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही
Up Man Hemant Jain Who buy Dawood Mumbai Shop
Dawood Ibrahim : उत्तर प्रदेशातल्या माणसाने विकत घेतली डॉन दाऊदच्या नावे असलेली मालमत्ता, ताबा मिळवण्यासाठी २३ वर्षांचा लढा
sonali kulkarni bought new new mercedes benz car
सोनाली कुलकर्णीने खरेदी केली मर्सिडीज-बेंझ! अभिनेत्रीचं नव्या गाडीसह खास फोटोशूट, कारची किंमत किती?

हेही वाचा…उरण : धो- धो मुसळधार पावसात जेएनपीए कामगारांचे प्रशासना विरोधात आंदोलन

मात्र पैसे वळते होत नाहीत असे शर्मा याने सांगितल्यावर क्युआर कोड पाठवला. त्यावरून काही पैसे पाठवले व मिळाले का विचारणा केली दुसऱ्या बँकेत खाते आहे का विचारणा करीत दोन्ही खाते संबंधी मोबाईल वर क्यू आर कोड आणि स्कॅनर बाबर शर्मा यांनी काही ठिकाणी क्लिक करण्यास सांगितले त्यानुसार भास्कर यांनी केल्यावर त्यांच्या बँक खात्यातील २ लाख ७ हजार ७८ रुपये स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले .ही बाब लक्षात भास्कर यांच्या लक्षात आली  मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना खात्री पटली त्यामुळे त्यांनी याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पवार करीत आहेत. 

Story img Loader