नवी मुंबई : सट्टा बाजारात गुंतवणूक आमच्या मार्गदर्शनाखाली करा आणि भरघोस परतावा आणि तेही कमी वेळात अशा आशयाच्या जाहिरातीला बळी पडून एका व्यक्तीने तब्बल ५२ लाख १३ हजार ४३३ रुपये गमावले आहेत. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवीण शिंदे असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी काही महिन्यापूर्वी समाज माध्यमात एक जाहिरात वाचली होती त्यानुसार सट्टा बाजारात योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा परतावा मिळवून देऊ असे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुनील यांनी ऑनलाइनच त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी सांगेल ते लिंक द्वारे अ‍ॅप डाउनलोड केले आणि पैसे गुंतवणे सुरु केले.

हेही वाचा…अनाथ मुले व तृतियपंथींसोबत पोलीसांची अनोखी रंगपंचमी

परतावा किती मिळाला आणि गुंतवणूक किती केली हे सर्व अ‍ॅप वर दिसत असल्याने आणि सुरुवातीला परतावा मिळाल्याने प्रवीण यांचा विश्वास बसला. आणि त्यांनी हळू हळू करीत २ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान २ लाख १३ हजार ४३३ रुपये गुंतवले. मात्र अ‍ॅप मध्ये भरघोस परतावा दिसत असताना बँक खात्यात का दिला जात नाही असा प्रश्न करीत लवकरात लवकर द्यावा म्हणून तगादा लावला तेव्हा मात्र आरोपींनी संपर्क बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा होताच सायबर पोलिसांनी संबंधित चार जणांवर सायबर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai man loses rs 52 lakh to investment scam cyber police register case psg
Show comments