नवी मुंबई : बेपत्ता विवाहित महिला तपासप्रकरणी दिरंगाई केल्याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक मीना वऱ्हाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. 

नवी मुंबईतील एक विवाहित महिला ६ तारखेला घरगुती कारणांनी घरातून निघून गेली. तिच्या सासरच्या लोकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती नातेवाईक परिचित आणि माहेरीही गेली नसल्याने तिचे पती आणि वडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आले असता त्यांचा तात्काळ जबाब नोंद करून घेण्यात आला नाही. तसेच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  बेपत्ता महिलेचा तपास चालू केला नाही. महिला बेपत्ताप्रकरणी तात्काळ  कायदेशीर प्रक्रिया सुरू करणे आदेश असताना दिरंगाई केली. 

हेही वाचा – मोरबे धरण ५१ टक्के भरले ! धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, आतापर्यंत १६२६ मिमी पावसाची नोंद

हा अत्यंत बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नैतिक दृष्ट्या जनमाणसांमध्ये पोलीस दलाविषयी संभ्रम व संशय निर्माण करून पोलीस दलाची प्रतिमा जनमाणसांत मलीन केली आहे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. 

हेही वाचा – सिडको वसाहतींमध्ये पाणीटंचाई; २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिक हवालदिल, उरणवासीयांना मात्र कपातीपासून दिलासा

बेपत्ता झालेली महिला शीळ फाटा येथील मंदिरात गेली होती. तिला चहातून गुंगीचे औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला, तसेच तिची निर्घृण हत्याही करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र तिची बेपत्ता तक्रारीची वेळीच दखल घेतली असता पुढील प्रसंग गुदरला नसता, असा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला.