नवी मुंबई : शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे कितीही जनजागृती केली तरीही नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे स्वच्छतेची पाहणी करण्यास येणाऱ्या संभावित ठिकाणी मनपाच्या घनकचरा विभागाने स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईने स्वच्छ शहरात आता नंबर पहिला आणण्याचा संकल्प केला असून त्याचे ब्रँड एमबॅसडर म्हणून अनेक वर्षांपासून नवी मुंबईचे रहिवासी जगप्रसिद्ध गायक वादक संगीतकार शंकर महादेवन आहेत. ते स्वतः स्वच्छतेची जनजागृती करतात, मात्र तरीही ठराविक काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर कचराकुंडी नसताना कचरा टाकतात. यासाठी घनकचरा विभागाने कचरा वहन करणाऱ्या गाड्यांची फेरीही वाढवली. जेणेकरून ज्यांना दिवसा वेळ मिळत नाही अशांनी निदान रात्री तरी थेट घंटा गाडीत कचरा टाकावा. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. असे ठिकाण सर्वाधिक कोपरखैरणे नोडमध्ये असून, सेक्टर १९ खाडी किनारी, सेक्टर १७ तीन टाकी समोर, सेक्टर ४ पेट्रोल पंप नजीक या ठिकाणी कचरा टाकला जातो. हा कचरा साधारण सकाळी साडेसहा ते १२ च्या दरम्यान लोक फेकून देतात. त्यामुळे अशा ठिकाणी परिसर स्वच्छ करत ज्या ठिकाणी कचरा टाकतात त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी खुर्ची टाकून बसवले गेले आहेत.

हेही वाचा – वाहन चालकांनो तुमच्यासाठीच! घरी कोणीतरी वाट पाहतेय सावकाश गाडी चालवा …रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह

कोणी कचरा टाकलाच की तात्काळ त्याला पकडून दंड ठोठावण्यात येतो. मात्र जेव्हापासून असे स्वच्छता कर्मचारी बसवण्यात आले तेव्हापासून कचरा टाकणाऱ्यांवर आळा बसला आहे. मात्र, अशी वेळच येऊ नये, असे मत जागरूक नागरिक संदीप थोरात यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांनाही मनपा कोपरखैरणे विभागाने वेळोवेळी आवाहन केले असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai mnc deployed sanitation workers at various places in navi mumbai for cleanliness ssb