नवी मुंबई : जून महिन्यात नवी मुंबई शहरात व धरणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले होते. नवी मुंबई शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत जून महिन्यात कमी पाऊस झाला . त्यामुळे आधीच सुरु असलेल्या पाणीकपातीत वाढ होणार की काय असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला होता. परंतु मागील काही दिवसापासून मोरवे धरण परिसरात दमदार पाऊस होता होतअसून मोरबे धरण ५१ टक्के भरले आहे. त्यामुळे यंदाही मोरवे धरण १००% भरण्याचे अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई शहरात जून महिना संपल्यानंतरही आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही.त्यामुळे मोरबे धरणातला साठाही कमी होऊ लागला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत मोरबे व शहरातही कमी पाऊस झाला असल्याने नागरीकांची व प्रशासनाची चिंता वाढली होती. त्यामुळे शहरात व मोरबे धरण परिसरातही पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालिकाही योग्य खबरदारी घेत असून दैनंदिन पाऊस तसेच पाणीपुरवठा याबाबत बारकाईने लक्ष ठेऊन असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ९ जूनला मोरवे धरण परिसरात व शहरात पावसाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु मागील आठवड्यापासून मोरबे धरण परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने मोरबे धरणाची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे सद्या मोरबे धरणात ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : सिडको वसाहतींमध्ये पाणीटंचाई; २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिक हवालदिल, उरणवासीयांना मात्र कपातीपासून दिलासा

मोरबे धरणातील पाणीसाठा सद्यस्थिती …

आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस – १६२६.८ मिमी.
धरणात झालेला पाणीसाठा – ९८.४४७ (५१.५७%) दशलक्ष घनमीटर
धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता – १९०..८९० दशलक्ष घन मीटर

नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण परिसरात मागील काही दिवसापासून चांगला पाऊस पडत असून ५१% धरण भरले आहे. धरण भरण्यासाठी अद्यापही २१०० मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे.

वसंत पडघन कार्यकारी अभियंता ,नवी मुंबई महापालिका
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai morbe dam fill upto 51 percent due to continuous rain from last few days css