नवी मुंबई : केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्यामुळे दंडाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम लोकअदालतमध्ये ५० टक्के कमी करावी म्हणून २३० वाहनचालकांनी अर्ज भरले.
नवी मुंबईतील ट्रक, टेम्पो, दुचाकी, मोटार, रिक्षा, स्कुटी, थ्री व्हीलर, टेम्पो या सर्व वाहन चालकांचे ऑनलाइन दंड ५० टक्के कमी करण्यासाठी शिव वाहतूक सेना व अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यामाने नेरुळमध्ये दोन दिवसीय शिबीर भरवले होते. यावेळी २३० वाहन चालकांनी अर्ज भरून घेतले असून हे अर्ज लोक आदालतमध्ये जमा करणार आहेत.
हेही वाचा – अखेर १४ गावे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात, कार्यकारी अभियंत्यांकडे कामकाजाची जबाबदारी
तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कर्मचाऱ्यांनी हे अर्ज भरण्यास वाहनचालकांना मोलाची मदत केली. त्यामुळे नवी मुंबईतील वाहन चालकांनी अशा प्रकारे स्वत: दंड कमी करायचे असतील तर प्रत्येक वाहतूक शाखेला संपर्क साधून अधिकृत अर्ज भरून दंड कमी करावेत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे व शिव वाहतूक सेना, अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल संचालक दिलीप आमले यांनी केले आहे.