संतोष जाधव
नवी मुंबई</strong>– नवी मुंबई शहरात पाणी टंचाईबाबत विविध विभागात नागरीकांच्या तक्रारी येत असल्यातरी दुसरीकडे पावसाने मागील पंधरा दिवसात दडी मारली आहे. पालिका आयुक्तांनी १५ ऑगस्टनंतर नवी मुंबई शहरातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता पालिका आयुक्तांनी वर्तवली होती. परंतू नवी मुंबई वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन म्हणून नवी मुंबईतील पाणीकपात तात्काळ रद्द होणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी लोकसत्ताला दिली आहे.त्यामुळे नवी मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय आणखी लाबंणीवर पडणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात नवी मुंबई शहरात २४ जूनपासून पावसाला सुरूवात झाली होती . यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत पाऊस न झाल्याने मोरबे धरणात फक्त ३३ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पालिकांनी पाणी टंचाईबाबत विशेष कृती आराखडा करण्यास सांगीतल्याप्रमाणे पालिकेने २८ एप्रिलपासून शहरातील ८ विभागात विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मोरबे धरणात ९१ .६३ टक्टके पाणीसाठा आहे. तरीही नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याबाबतचा निर्णय १५ ऑगस्टनंतर होईल अशी आशा नागरीकांना होती.परंतू पालिका आयुक्तांनी शहरातील पाणीकपात तात्काळ रद्द न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी लोकसत्ताला दिली आहे.
हेही वाचा >>>करंजाडे, कामोठे, कळंबोली येथील सिडको वसाहतीत पाण्याची बोंब; पावसाळ्यातही टँकर मागवण्याची वेळ
हेही वाचा >>>घाऊक व स्वस्त मासळीसाठी उरणला या ! करंजा बंदर खुला झाल्याने मासळीची आवक वाढली
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसर व नवी मुंबई शहरात चांगला पाऊस झाल्याने मोरबे धरण भरण्याची आशा निर्माण झाली होती. यंदा पावसाने मे अखेरपर्रंयंत सुरवात न केल्याने २०२२च्या तुलनेत मोरबे धरणात कमी जलसाठा शिल्लक होता. पावसाला सुरवात होईपर्यंत फक्त ३३ दिवस पुरेले एवढाच जलसाठा धरणात होता. त्यामुळे पालिका मात्र पाणीपुरवठ्याबाबत खबरदारी बाळगून होते. गेल्यावर्षीही मोरबे धरण पूर्ण भरलेले नव्हते. नवी मुंबई शहरात धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने व राज्यशासनाच्या पाण्याबाबतच्या उपाययोजनानुसार २८ एप्रिलपासूनच शहरात पाणीकपात सुरु करण्यात आली होती ती अद्याप सुरुच राहणार आहे. नवी मुंबईतील आमदार तसेच इतर पदाधिकाऱ्यांनीही पाणी कपात रद्द करण्याची मागणी वारंवार करत आहेत. एकीकडे नागरीक हंडा आंदोलन करत आहेत. तर काही जण पालिका अधिकाऱ्यांना मडका भेट देऊ लागले आहेत. त्यामुळे एकीकडे पाणीकपातीबाबत नागरीकांचा रोष वाढत असला तरी पालिका मात्र वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करता येईल यासाठी पालिका प्रशासन मात्र ठाम आहे. नवी मुंबई शहरात यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. परंतू जून महिना कोरडा गेला असताना जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसाने मोरबेची पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे धरणात पाणी असताना आम्हाला शहरात पाणी तुटवडा जाणवत आहे.नवी मुंबई शहरात पडलेल्या पावसापेक्षा मोरबे धरण परिसरात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. परंतू आयुक्त मात्र वर्षभर नीट पाणीपुरवठा होण्यासाठी तात्काळ पाणीकपात रद्द करणार नसल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई शहराला वर्षभर नीट पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत पालिका अत्यंत जबाबदारीने निर्णय घेत आहे. शहरात पाणीकपात ही एका विभागात आठवड्यातून एक दिवस फक्त संध्याकाळचा पाणीपुरवठा केला जात नाही.त्यामुळे धरणातील पाणीपुरवठा पुढील वर्षीच्या जूनपर्यंत योग्यरीतीने करता यावा याबाबत पालिका योग्य निर्णय घेत असून सध्या सुरु असलेली पाणीकपात तात्काळ लगेच रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.-राजेश नार्वेकर,आयुक्त ,नवी मुंबई महापालिका
२० ऑगस्टपर्यंत मोरबे धरणातील पाण्याची तुलनात्मक स्थिती
सन- २०२२ सन -२०२३
एकूण पाऊस- २६२३.६० मिमी २८९५.६० मिमी.
धरणाची पाणीपातळी- ८४. ६८ मीटर ८६.३३ मीटर
धरणातील पाणीसाठा – ८३.६५ टक्के ९१.६३ टक्के