नवी मुंबई – नवी मुंबई शहरात गौरीच्या आगमनानंतर वेगळ्याच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचा गौरी गणपती विसर्जन सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पडला. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर केलेल्या सुनियोजित व्यवस्थेमध्ये २२ नैसर्गिक आणि १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर एकूण १९,०८४ श्रीगणेशमूर्तींचे व २२३८ गौरींचे विसर्जन संपन्न झाले. पालिका आयुक्तांनी विविध विसर्जन स्थळांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे वाशी सेक्टर ६ येथील मध्यवर्ती विसर्जन तलावाच्या ठिकाणी आयुक्त राजेश नार्वेकर स्वयंसेवकांसह तराफ्यावरून श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी जलाशयात गेले आयुक्त स्वतः गणेश मूर्ती विसर्जनासाठी तलावात आल्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साह होता.

त्यामुळे स्वयंसेवकांनी आपण केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला पाहणीप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले , विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ १ उपायुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार तसेच यांसह विभाग अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.सर्व विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या चोख व्यवस्थेमध्ये २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर १४०७७ घरगुती तसेच २३८ सार्वजनिक मंडळांच्या एकूण १४३१५ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ४७३६ घरगुती तसेच ३३ सार्वजनिक मंडळांच्या ४७६९ श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे १८८१३ घरगुती व २७१ सार्वजनिक मंडळांच्या एकूण १९०८४ श्रीमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले.याशिवाय नैसर्गिक २२ विसर्जन स्थळांवर १४०४ गौरींचे आणि १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ८३४ गौरींचे अशाप्रकारे एकूण २२३८ गौरींचे विसर्जन व्यवस्थितरित्या पार पडले.यामध्ये बेलापूर विभागात ५ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर २२९० घरगुती व ४९ सार्वजनिक तसेच १९ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ४२५ घरगुती व १० सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर १३१ व कृत्रिम विसर्जन तलावांवर ४८ गौरींचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १६१ विसर्जन स्थळांवर १८८१३ घरगुती व २७१ सार्वजनिक अशा १९०८४ श्रीगणेशमूर्तींना व २२३८ गौराईंना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा >>>मोरबे धरण १०० टक्के भरले! धरणातून १९.०८७ क्युबीक मीटर पाण्याचा विसर्ग, जलचिंता मिटली पण १० टक्के पाणीकपात सुरुच राहणार

गौरीसह विसर्जित होणाऱ्या श्री गणेशमूर्तींची संख्या मोठी असते हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व विसर्जन स्थळांवर अधिक चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्वतः महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर तसेच दोन्ही अतिरिक्त आयुक्त, दोन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व विभागप्रमुख विविध विसर्जन स्थळांवरील व्यवस्था बारकाईने पाहत होते.नैसर्गिक जलस्त्रोतांच्या शुध्दतेसाठी श्रीमूर्तींचे विसर्जन करताना कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत होते. महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी १४१ इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याला पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ४६६९ श्रीगणेशमूर्तींचे भाविकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले.

हेही वाचा >>>नवी मुंबई: चार दिवसाची नकोशी बॅगेत आढळली, आरोपी सीसीटीव्हीत कैद

त्यासोबतच १४ मुख्य विसर्जन तलावांमधील जलाशय प्रदूषित होऊ नयेत याकरिता निर्माण केलेल्या गॅबियन वॉल अंतर्गत भागात मूर्ती विसर्जित करून नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा पार पडण्यावर भर दिला.सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था, आकाराने मोठ्या मूर्तींसाठी फोर्कलिफ्टची व्यवस्था ठेवण्यात आली होती. उपस्थित भाविकांना आणि ध्वनीक्षेपकाद्वारे व्यासपीठावरून महत्त्वाच्या सूचना दिल्या जात होत्या. पुरेशा प्रमाणात विद्युत व्यवस्था तसेच पर्यायी जनरेटर व्यवस्था होती. मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात होती शिवाय संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतीशीलपणे कार्यरत होती. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत होते.नवी मुंबई हे स्वच्छतेत अग्रणी असलेले शहर असल्याने विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यात येत होते. प्रत्येक विसर्जनस्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. कालच्या गौरी गणपती विसर्जन सोहळ्यात ३३ टन ६४० किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सेक्टर १९, कोपरखैरणे येथील मुख्य विसर्जन तलावाच्या ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. श्रीसदस्य समुहाने संकलित निर्माल्य वेगळे करीत असलेल्या ठिकाणी आयुक्तांनी भेट देऊन श्रीसदस्यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणेचा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त होता.नवी मुंबईकर नागरिक हे शिस्तप्रेमी असल्याने सर्वांच्या सहकार्यातूनच श्री गणेशोत्सवातील मोठ्या प्रमाणात होणारे गौरी गणपतीचे विसर्जन सुव्यवस्थितरित्या संपन्न झाले.

Story img Loader