नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा सर्वात मोठा स्राोत हा मालमत्ता कर असून २०२३- २४ या आर्थिक वर्षात पालिकेने ७१६ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा झाले आहे. २०२२-२३ या मागील आर्थिक वर्षापेक्षा यंदा ८३.६६ कोटींनी अधिक मालमत्ता कर वसुल करण्यात आला आहे. मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसूलाचा हा आत्तापर्यंतचा विक्रम आहे. यंदा पालिकेने ८०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले होते.

मागील वर्षी महापालिकेकडे मालमत्ता करापोटी ६३३.३१ कोटी इतकी रक्कम जमा झाली होती. यावर्षी वसुलीचे सुयोग्य नियोजन करीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने सुरुवातीपासूनच मालमत्ता कर थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यांच्या थकबाकी रक्कमेनुसार उतरत्या क्रमाने याद्या तयार करण्यात येऊन अधिकाधिक महसूल वसुलीचे नियोजन करण्यात आले होते. पालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व थकीत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा व्हावा यादृष्टीने सबंध मार्चमध्ये मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली होती.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

हेही वाचा…कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

हजार ७४० थकबाकीदारांकडून कर जमा

१ ते २० मार्च या कालावधीत थकबाकीच्या दंडात्मक रककमेवर ७५ टक्के सवलत तसेच २१ ते ३१ मार्च या कालावधीत ५० टक्के सवलत लागू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला व ८ हजार ७४० थकबाकीदारांनी ११६ कोटी रुपये इतकी रक्कम अभय योजनेअंतर्गत थकबाकीच्या दंडात्मक रकमेवरील सुटीचा लाभ घेत भरणा केली. या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना ४५.५६ कोटी रुपये इतकी रक्कम सवलत देण्यात आली. याचा एकत्रित परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत ८३.६६ कोटी अधिकची मालमत्ता करवसुली झाली.

सकारात्मक प्रतिसादामुळे यंदा चांगलीकर वसुली झाली आहे. महापालिकेतर्फे दर्जेदार सेवा पुरवण्यात येतील यंदाची वसुली ही पालिकेच्या इतिहासातील विक्रमीकर वसुली आहे. – शरद पवार, उपायुक्त, प्रशासन व मालमत्ता कर

हेही वाचा…उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम

तीन दिवसांतील वसुली

२९ मार्च- २८.७८ कोटी

३० मार्च- ८.३८ कोटी

३१ मार्च- ४.१० कोटी

Story img Loader