नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिवाबत्ती खांबांवरून विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकल्याचे दिसून आले आहे. यामुळे दिवाबत्ती खांब पडण्याचे, खांबावरील ब्रॅकेट व फिटिंगची दिशा बदलण्याचे प्रकार वारंवार घडत असून त्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. तंसच अशा केबल्समुळे शहर सौंदर्यीकरणालाही मोठ्या प्रमाणावर बाधा पोहोचत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका विद्युत विभागाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व केबल ऑपरेटर तसेच इंटरनेट सर्व्हिस पुरवठादार यांना केबल त्वरित पुढील १५ दिवसांच्या कालावधीत काढून टाकण्याबाबत सूचना केल्या आहेत.

हेही वाचा… नवी मुंबई: कांदा बटाटा बाजारात ९७ शेतकऱ्यांच्या मालधनी तक्रारी; ३ कोटी हुन अधिक थकबाकी , सन २०११ पासुनच्या तक्रारी

याबाबतची अंमलबजावणी संबंधित केबल ऑपरेटर तसेच इंटरनेट सर्व्हिस पुरवठादार यांनी न केल्यास संबंधित केबल्स हटविण्यात येतील व यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल संबंधित केबल ऑपरेटर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जबाबदार असतील, असे नवी मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation appeals to concerned agencies to remove unauthorized cables placed on electric poles in the city dvr
Show comments