लाल कुंडय़ांना अल्प प्रतिसाद;  इलेक्ट्रॉनिक भंगार विल्हेवाटीचा प्रश्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वापर होत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निरूपयोगी झाल्यानंतर त्यांचे एकत्रित संकलन करून शास्त्रोक्त पद्धतीन विल्हेवाट लावण्याच्या हेतूने नवी मुंबई महापालिकेने शहरात तीन ठिकाणी बसवलेल्या लाल रंगाच्या कचराकुंडय़ांना नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षभरात या तीन कुंडय़ांत मिळून जेमतेम १०० किलो ई-कचरा जमा झाल्याने ही मोहीम फसल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने आता मोठमोठी गृहसंकुले आणि शाळांच्या आवारात ई कचरा संकलन करणाऱ्या कुंडय़ा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर वाढला आहे. तंत्रज्ञानात झपाटय़ाने बदल होत असल्याने अल्पावधीतच जुन्या वस्तू कालबाह्य होतात. या वस्तू भंगार विक्रेत्यांना विकल्या जातात किंवा थेट कचऱ्यात टाकल्या जातात. मात्र, अशा प्रकारे या वस्तूंची विल्हेवाट लावणे धोकादायक ठरू शकते. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने गतवर्षी जून महिन्यात वाशी, बेलापूर आणि नेरूळ या भागांत तीन ठिकाणी ई-कचरा संकलनासाठी लाल रंगाच्या कुंडय़ा बसवल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षभरात या तीन कुंडय़ांमध्ये अवघा १०० किलो ई-कचरा जमा झाला आहे.

पालिकेने शहरात एकूण १०० ठिकाणी अशा कुंडय़ा बसवण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापैकी तीन ठिकाणीच या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने आता उरलेल्या कुंडय़ा शहरातील मोठी गृहसंकुले तसेच शाळांच्या आवारात बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. रोटरी क्लब, नवी मुंबई फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्ट, जैन जागृती मंडळ, पब्लिक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडिया आणि साधू वासवाणी इंटरनॅशनल स्कूल यांच्या मदतीने शहरात ई-कचरा संकलनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये या संस्था विविध सोसायटय़ांना आवश्यकतेनुसार कुंडय़ा पुरविणार आहेत.

ई-कचरा म्हणजे केवळ टाकून द्यावयाचे भंगार नसून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली नाही तर त्यामुळे पर्यावरणाची हानी होतेच, शिवाय ते घातकही आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या संकुलात ई-कचरा जमा करून पालिकेला द्यावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

ई-कचरा कोणता?

संगणक, टीव्ही, फ्रिज, लॅपटॉप, ए.सी., मोबाइल फोन, कॉम्प्रेसर, टेलिफोन, फॅक्स मशीन, ई.जी.बी.एक्स. मशीन, प्रिंटर, वॉशिंग मशीन, सी.डी., डीव्हीडी, फ्लॉपी, पेन ड्राइव्ह, टेप रेकॉर्डर, कॅसेट्स, वायर, केबल, स्विच, एक्स-रे फिल्म्स, पंखे या निकामी वस्तू वा त्यांचे सुटे भाग.

शास्त्रीय पद्धतीने  विल्हेवाट

ई-कचऱ्याची  शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता असलेल्या एमआयडीसीतील इको—फ्रेंड इंडस्ट्री कचऱ्याचे विघटन करणार आहे.

शहरातील ई-कचरा संकलनासाठी लाल रंगांच्या कुंडय़ा बसविण्यात येणार होत्या. प्राथमिक स्तरावर तीन ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. उर्वरित १०० ठिकाणी सर्वेक्षण करून बसविण्याचे नियोजन होते, परंतु अल्प जमा झाल्याने आता त्या कुंडय़ा शाळा, सोसायटी, खासगी संस्था यांना देण्यात येणार आहेत.

-तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन,  नवी मुंबई महानगरपालिका