नवी मुंबई : नेरुळ विभागात शिरवणेगाव, सेक्टर १ येथील तस्लीम बिल्डींग, घर नं. १६०३ ही तळमजला अधिक दोन मजली इमारत अतिधोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्याने तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीत राहणाऱ्या १२ कुटुंबांतील ६१ नागरिकांना पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार विभाग अधिकारी तथा सहायक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांनी गावदेवी समाजमंदिर, जुईनगर, सेक्टर २३ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासह त्यांना जेवण व मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येत आहेत. त्यावरील नियंत्रणासाठी विभाग कार्यालयामार्फत दोन नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

हेही वाचा…नवी मुंबई : एपीएमसी फळ बाजारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

मागील २५ वर्षापासून अधिक कालावधी लोटल्यानंतरही या अनधिकृत इमारतीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग नक्की काय करतो असा प्रश्न समोर आला आहे.

या इमारतीची निर्मिती १९९२ च्या आजसपास झाली असून तेव्हापासून ही अनधिकृत इमारत बेकायदा आहे. सध्य स्थितीला इमारत अत्यंत जीर्ण झाली असून केव्हाही ढासळण्याच्या स्थितीत असतानाही त्या ठिकाणी १२ कुटुंबे व ६१ नागरिक राहत होते. परंतु, नेरुळ सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांना इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने ही इमारत रिकामी केली आहे. या नागरिकांची सोय जुईनगर येथे महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा…२१ तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल; उरण फाटा, नेरुळ, सीबीडी,एपीएमसी पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील शिरवणे गावात मागील २५ वर्षांपासून बेकायदा इमारतीत १२ कुटुंबं व ६१ नागरिक राहत होते. परंतु या इमारतीची अवस्था अत्यंत बिकट व धोकादायक असल्याने पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलिसांच्या मदतीने इमारत रिकामी करण्यात आली आहे. या नागरिकांची सोय जुईनगर येथील गावदेवी समाजमंदिर येथे करण्यात आली आहे. – डॉ.अमोल पालवे, सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई महापालिका