लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : मुंबईनंतर स्वत:च्या मालकीचे धरण असलेली राज्यातील एकमेव महापालिका असा नावलौकिक मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला येत्या पाच वर्षांत पाणीपुरवठ्यासाठी नव्या स्रोतांची तजवीज करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट मत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी गुरुवारी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील भीरा पाणीपुरवठा प्रकल्पातील पाणी नवी मुंबईला मिळावे यासाठी ठोस असा रोडमॅप तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातील पाणी मंजुर कोट्यानुसार नवी मुंबईला मिळावे यासाठी आपण आग्रही असून त्यासाठी नव्याने प्रयत्न केले जातील, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी या कार्यक्रमात केली.

नवी मुंबई महापालिका आणि महापालिका परिवहन उपक्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदीर संजीव नाईक तसेच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहराच्या विकासाचा सविस्तर आढावा घेताना वनमंत्री गणेश नाईक आणि आयुक्त डॉ. शिंदे यांनी वाढते नागरीकरणास आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या नियोजनाची गरज व्यक्त केली.

आणखी वाचा-नियम मोडणाऱ्या बिल्डरांच्या परवानग्या रद्द; महापालिका प्रशासनाचा इशारा

मोरबे धरणामुळे नवी मुंबई महापालिकेकडे पाणीपुरवठ्याचा स्वतंत्र्य स्रोत उपलब्ध असला तरी भविष्यात शहराची पाण्याची गरज वाढणार आहे. शहराचा विकास आणि येथील पुनर्विकास प्रकल्पांची गती पाहिली तर पुढील २०-२५ वर्षांत या शहराची लोकसंख्या ४५ लाखांपेक्षा पुढे जाऊ शकते. त्यामुळे इतक्या मोठया लोकसंख्येसाठी वाढीव पाण्याचे नियोजन आतापासूनच करण्याची आवश्यकता आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यातील भिरा पाणीपुरवठा प्रकल्पाचे पाणी नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिले जावे यासाठी सविस्तर असा रोडमॅप महापालिकेने तयार केला असून लवकरच तो राज्य सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल, असेही डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. मोरबे धरणाच्या जोडीला महापालिकेकडे आणखी एक पाण्याचा स्रोत हवा आणि तो पुढील पाच वर्षांत प्रत्यक्षात यायला हवा, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी वाचा-Cidco Scheme Deadline: ‘सिडको’नं परवडणाऱ्या घरांसाठी अर्जाची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!

बारवीच्या पाण्यासाठी नव्याने बैठका

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित असणाऱ्या बारवी धरणातून नवी मुंबई मंजूर असलेला पाण्याचा वाटा पुर्णपणे मिळावा यासाठी आपण सरकार दरबारी आग्रह धरणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले. बारवी धरणातून नवी मुंबई महापालिकेला मंजूर असलेल्या पाण्याचा पूर्ण वाटा मिळत नसल्याने शहरातील घणसोली, दिघा, ऐरोली यांसारख्या उपनगरांमध्ये नियमित पाण्याचा पुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाची दमछाक होत असते.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाटबंधारेमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासमवेत या मुद्द्यावर लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले. भिरा धरण प्रकल्पाचे हस्तांतरण आणि बारवी धरणाच्या पाण्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेत आणला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी वाचा-मोरा-मुंबई रो रो सेवा मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित; अनेक महिने बंद असलेले काम पुन्हा सुरू

परिवहनचे प्रश्न सोडवा

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम अधिक उत्तम पद्धतीने चालण्याची आवश्यकता असून या ठिकाणचा सावळागोंधळ थांबायला हवा अशी अपेक्षा आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली. या परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा मिळावी तसेच ही सेवा तोट्यात चालू नये यासाठी कठोर उपाय आखण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच परिवहन विभागाच्या प्रश्नांसंबंधी लवकरच विशेष बैठकीचे आयोजन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.