केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमार्फत “स्वच्छ सर्वेक्षण २०२३” अंतर्गत ओला व सुका कचरा याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासाठी “स्वच्छता के दो रंग” ही मोहीम १७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने विविध उपक्रम घेणात येत आहेत. मुलांमधील मोबाईल गेम्सची आवड लक्षात घेऊन हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे महत्व मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेने इन्स्टाग्रामवर “प्ले – वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट यूअर वेस्ट)” हा कचरा वर्गीकरणाविषयीचा स्पेशल गेम लाँच करण्यात आला. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते गेमचे लॉंचिंग करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : भास्कर जाधवांसह ठाकरे गटाच्या चार बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल, प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप

या गेममध्ये ओल्या कचऱ्यात कोणते घटक येतात व सुक्या कचऱ्यामध्ये कोणते घटक येतात याविषयीचे मुलांचे ज्ञान जाणून घेण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामवर लाँच केलेल्या “प्ले – वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट यूअर वेस्ट)” हा गेम खेळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या @nmmconline या इन्स्टाग्राम पेजवर सहजपणे कचरा वर्गीकरणाचा हा गेम खेळता येऊ शकणार आहे. केंद्र सरकारच्या “स्वच्छता के दो रंग” या मोहिमेअंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याविषयी ‘ओलू’ व ‘सुकू’ या नवी मुंबई महानगरपालिकेने प्रदर्शित केलेल्या कार्टून पात्रांची मुलांमधली लोकप्रियता तसेच मुलांना असलेली मोबाईल गेमची आवड लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण रितीने “प्ले – वेस्ट सेग्रीगेशन” या इन्स्टाग्रामवरील खेळाची रचना करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील हुशार मुले स्वत: हा खेळ खेळून ओल्या कचऱ्यात कोणते साहित्य व सुक्या कचऱ्यात कोणते साहित्य याविषयी आपल्याला असलेल्या माहितीची खेळाव्दारे खातरजमा करून घेतलीच याशिवाय आपल्या पालकांनाही हा खेळ खेळायला लावून त्यांनाही कचरा वर्गीकरणाचे महत्व जाणवून देतील असा विश्वास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- दि.बा. पाटलांच्या नावाने २०२३ ला उरणमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार

असा खेळता येणार गेम

प्ले – वेस्ट सेग्रीगेशन” गेमच्या सुरुवातीला लिंकवर क्लिक केल्यानंतर गेम खेळणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर मुकुट दिसेल. त्या मुकुटाच्या एका बाजूला “ओलू” म्हणजे ओला कचरा व दुसऱ्या बाजुला “सुकू” म्हणजेच सुका कचरा याचे आयकॉन दिसतील. मुकुटाच्या मध्यभागी एकेक करून कागद, फुले, फळे अशा साहित्याची नावे दिसतील. त्यामधील ओल्या कचऱ्यात जाणारे साहित्य कुठले व सुक्या कचऱ्यात जाणारे साहित्य कुठले हे ओळखून मुलांनी डाव्या किंवा उजव्या बाजूला मान झुकवली की योग्य उत्तरानुसार त्यांना मिळालेले गुण प्रदर्शित होतात. यामुळे मुलांना कोणता कचरा कोणत्या डब्यात याविषयीचे कचरा वर्गीकरणाबाबत ज्ञानात भर पडणार असून हसत खेळत कचरा वर्गीकरणाची माहिती प्राप्त होणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation launched a special game on waste segregation called play waste segregation on instagram dpj
Show comments