पावसाळ्यात तुर्भे गावातील अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. डांबरी रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडले आहेत.  मात्र पावसाने उघडीप दिल्यावरही कुठलीही डागडुजी न केल्याने वाहन चालक आणि पादचारी लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांना पाठदुखी सुरू झाल्याचे उदाहरणे आहेत. तुर्भे गावातील अंतर्गत भागात बहुतांश ठिकाणी डांबरी रस्ते आहेत. यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न पडता पावसाने मोठी उघडीप दिली मात्र रस्ते दुरुस्ती तर दूर डागडुजी सुद्धा करण्यात आलेली नाही. मोठ्या खड्ड्यात केवळ खडी टाकण्यात आली मात्र एक दिड तासांच्या वाहतुकीत जैसे थे परिस्थिती होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘मला आणखी सुट्टी द्या’, कुख्यात डॉन अरुण गवळी न्यायालयात

सामंत शाळा, तलाठी कार्यालय ते तुर्भे गाव प्रवेशद्वार कमान, पेट्रोल पंप मागील सर्व्हिस रस्ता, जैन मंदिर रस्ता, तसेच महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाकडून तुर्भे नाकाकडे जाणारा रस्ता,. मंजुला सायकल मार्ट ते हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता,   तसेच  आदी ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. या शिवाय हॉटेल  चिराग पासून शीव पनवेल महामार्गाकडे जाणारा रस्ता . चिराग हॉटेल ते गणराज हॉटेल समोरील रस्त्याचीही पूर्णपणे चाळण झाली आहे.

हेही वाचा >>> यंदा नवी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी

 या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातही होत आहेत. इतकेच नाही, तर मणक्याचे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिकच फटका बसत आहे.अशी खंत स्थानिक रहिवासी विक्रम कांबळे यांनी व्यक्त केली.  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून येथील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  सर्व ठिकाणचे खड्डे तात्पुरते स्वरूपात भरले जातात. पाऊस उघडताच त्या ठिकाणचे खड्डे पुन्हा भरून घेऊन डांबरीकरणही करण्यात येत आहेत, अशी माहिती अभियांत्रिकी विभागाने दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation neglecting pothole on internal roads in turbhe village zws