नवी मुंबई : स्वच्छ तीर्थ मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मंदिरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांसह अधिकारी मंदिर स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सखोल स्वच्छता मोहीम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी राबविण्यास सुरुवात झाली आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतांतर्गत वाशी व कोपरखैरणे विभागातील प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. काटेकोरपणे संपूर्ण स्वच्छता करण्याचे निर्देश दिले.
जागृतेश्वर शिव मंदिर, सेक्टर-६, वाशी येथे देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागातील पावणेश्वर मंदिर परिसराच्या स्वच्छतेत मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. त्यासोबतच या मोहिमेत आपापल्या क्षेत्रात वाशी व कोपरखैरणे विभागाचे साहाय्यक आयुक्त कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. पालिका आय़ुक्तांनी मंदिर व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आयुक्तांनी त्यांस मंदिराच्या अंतर्गत व बाह्य स्वच्छतेचे महत्त्व सांगितले.
हेही वाचा : कळंबोलीतील तरुणी हत्या प्रकरणाच्या तपासास विलंब का?
निर्माल्याची पावित्र्य राखून विल्हेवाट
शहरातील सर्व धार्मिक स्थळांना टाकाऊपासून टिकाऊ संपत्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने फुले, प्रसाद अशा निर्माल्याचे पावित्र्य राखून विल्हेवाट लावावी, असे सूचित केले. त्याचप्रमाणे २० व २१ तारखेला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मंदिरावर तेथील व्यवस्थापनामार्फत विद्युत रोषणाई करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांनी लक्ष द्यावे, असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.