नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर रबाळे नवी मुंबई येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त “चमत्कारा मागील विज्ञान”हे नवी मुंबई अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अशोक निकम यांचे व्याख्यान प्रात्यक्षिक व प्रयोगासह सादरीकरण विद्यार्थ्यांच्या समोर करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- टॅक्सी हेल्पलाईन गुगलवरून शोधताहेत? सावधान! खात्री करा, अन्यथा बसू शकतो आर्थिक फटका..

याप्रसंगी शाळेच्या स्वच्छता दूत असलेल्या श्रीमती रत्‍नाबाई तुकाराम जाधव या आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,साडी चोळी देऊन मान्यवर व मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

हेही वाचा- खारकोपर ते नेरुळ – बेलापूर लोकल पूर्ववत होण्यासाठी पाच तास लागणार

अनिसचे सक्रिय कार्यकर्ते व क्रीडाशिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी बुवा, बाबा, मांत्रिक हे चमत्कार करत नसून त्या सर्व गोष्टी पाठीमागे विज्ञान आहे. कार्यकारण संबंध आहे वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजामधील अनेक अंधश्रद्धा आपण सर्व मिळून हद्दपार करू शकतो हेच आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामागचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. अनिसचे सक्रिय कार्यकर्ते व नवी मुंबई कार्याध्यक्ष अशोक निकम यांनी विभूती काढणे,नारळातून रिबीन काढणे,पाण्याने दिवा पेटवणे, मंत्राने अग्नी पेटवणे, प्रसाद म्हणून चमत्काराने पाणी ऐवजी शेंगदाणे देणे असे प्रयोग विद्यार्थ्यांच्या सहभागासह प्रात्यक्षिक करून दाखवले व हे सर्व चमत्कार रासायनिक अभिक्रिया व विविध लागणारे साहित्य वापरून तुम्हीही घरी करू शकता. बुवा बाबा मांत्रिक आपणा सर्वांचे अज्ञान लक्षात घेऊन असे चमत्कार करून आपल्याला फसवतात व आपण त्याला बळी पडतो . त्यामुळे आपले आर्थिक सामाजिक लैंगिक शोषण होते. आज विज्ञान दिनानिमित्त आपण हे प्रयोग पाहिलेत तर अशा बुवा बाबांना तुम्ही फसू नका प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान व कार्यकारण संबंध आहे. म्हणून हे सगळे चमत्कार घडतात असे पटवून दिले. आठवी व नववीचे ४३० विद्यार्थ्यांसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation organized science lecture behind miracles on the occasion of national science day at rajarshi chhatrapati shahu maharaj vidyalaya dpj