३ हजार ६०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता

नवी मुंबई कोणतीही करवाढ न करता पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी शुक्रवारी पालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवी मुंबई पालिका राज्यातील श्रीमंत पालिकांपैकी असून यंदाचा अर्थसंकल्प हा ३ हजार ६०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

भविष्याचा विचर करून हा अर्थसंकल्प मांडण्यात येत असून वास्तववादी असेल, असे पालिका आयुक्तांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

यंदा महापालिका मोठे प्रकल्प हाती घेणार असून यामध्ये वाशीतील तरण तलाव, वंडर्स पार्क येथे सायन्स सेन्टर, सीबीडी येथे बाह्यवळण रस्ता, पार्किंग समस्या मार्गी लावण्यासाठी सीबीडीपासून बहुउद्देशीय इमारती उभारल्या जाणार आहेत.

पालिकेच्या वित्त संस्थामध्ये २ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. सन २०१९ च्या कलावधीत नागरी कामे रखडण्याची शक्यता असल्याने या तीन महिन्यांत ७७५ कोटींची कामे करण्यात येणार आहेत.

सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पातून १ हजार ५२४ कोटी खर्च तर मालमत्ता करातून ५३५ कोटी व स्थानिक संस्था करातून १ हजार १९५ कोटी उत्पन्न मिळाले होते. तसेच सन २०१८-१९ या अर्थसंकल्पात १२ जानेवारीपर्यंत १ हजार २५४ कोटी खर्च करण्यात आले असून

मालमत्ता करातून ४३५ कोटी तर स्थानिक संस्था करातून ९४८ कोटी उत्पन्न मिळाले आहे.

Story img Loader