संतोष जाधव, लोकसत्ता
नवी मुंबई : या वर्षी नवी मुंबई महापालिकेने थकीत मालमत्ता करावर मोठी सूट देणारी अभय योजना राबवूनही मार्चअखेर करवसुलीत १४२ कोटींची तूट आली आहे. त्यात आता करोनाचे संकट सुरू असल्याने करवसुली ठप्प झाली असून खर्च वाढला आहे. त्यामुळे पुढील काळात पालिकेचे आर्थिक चक्र बिघडणार असल्याचे संकेत पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
या वर्षी पालिकेने ७०० कोटींपर्यंत मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यक्षात ५५४ कोटींची करवसुली झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेवेळी मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यावर कर निश्चिती करण्यात आली होती. परंतु पालिकेत मोठय़ा एकाच मालमत्तेवर दुबार बिले असल्यामुळे थकीत मालमत्तेचा फुगवटा २१०० कोटीपर्यंत गेला आहे. पालिका स्थापन झाल्यापासूनच हा बिलांचा घोळ सुरू आहे. शहरात सुमारे ३ लाख १५ हजार मालमत्ताकरधारक असून फेब्रुवारी महिन्यापर्यंत पालिकेने ५३९ कोटी वसुली केली आहे. त्यात अभय योजनेद्वारे १९१ कोटींची वसुली झाली होती. आर्थिक मंदीचा फटका शेजारील मुंबई व ठाणे महापालिकेच्या मालमत्ता वसुलीत दिसत असताना नवी मुंबई महापालिकेत मात्र इतर महापालिकांच्या तुलनेत चांगली वसुली झाली होती. परंतु करोनाच्या संकटामुळे पालिकेच्या तिजोरीलाही फटका बसला आहे. त्यात सिडको तसेच शासकीय आस्थापनांकडून येणारी थकबाकीही मोठी आहे. प्रत्यक्ष नियमित मालमत्ता करवसुली ३४९ कोटी झाली आहे. तर अभय योजनेद्वारे २०५ कोटी वसुली झाली आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्ष करवसुली ४९१ कोटी होती ती या वर्षी ३४९ कोटीवर खाली आली आहे.
मालमत्ता करवसुली
सन २०१६-१७ : ६४४ कोटी
सन २०१७-१८ : ५३५ कोटी
सन २०१८-१९ : ४९१ कोटी
सन २०१९-२० : ३४९ कोटी
नवी मुंबई महापालिकेला नियमित करवसुली करण्यात करोनाच्या संकटामुळे अडथळा आला आहे. पालिकेचे लक्ष करोनावर मात करण्याचे आहे. विकासकामांवरही याचा परिणाम होणार असून खर्चावरही निर्बंध घातले जाणार आहेत.
-अण्णासाहेब मिसाळ,आयुक्त, नवी मुंबई महापालिका