बेसुमार फलकबाजीने शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे. गणेशोत्सव काळात शहरभर फलकबाजी पाहायला मिळत होती. अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनानंतरच पालिकेने कारवाईचा सपाटा लावला असूनदोन दिवसांत जवळजवळ २५०० पेक्षा अधिक फलक पालिकेने हटवले आहेत.
गणेशोत्सव काळात शहरातील चौकाचौकांत फलकबाजीला ऊत आल्याचे पाहायला मिळाले होते. त् परंतु पालिकेने गणेशोत्सवानंतर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विभागांत अनंत चतुर्दशीनंतर कारवाई केली आहे. पालिकेने दोन दिवसांत केलेल्या कारवाईत १८९३ छोटे ६२३ मोठे असे एकूण दोन हजार ५१६ फलकांवर कारवाई केली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
पालिका क्षेत्रातील जाहिरातीचे बॅनर छपाई करून देणाऱ्या एकूण २२ प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांना विभाग कार्यालयामार्फत लेखी सूचना देण्यात आल्या. नवी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे जाहिरात/बॅनर्स/पोस्टर्स छापू नयेत व तसे केल्यास त्यांना महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम ११९५ चे कलम ३ नुसार छपाई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील फलकबाजीला आळा घालण्यासाठी पालिकेने संबंधित बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर तसेच पालिकेची फलक लावण्यासाठीची परवानगी दाखवल्याशिवाय फलक छपाईच न करण्याचा निर्णय घेतला आहे.