नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे जोरात * अतिक्रमणाबाबतची सर्वच विभागातील माहिती जनतेसमोर मांडण्याची मागणी
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे नवी मुंबई शहरातील मूळ गावठणाभोवती या अनधिकृत बांधकामांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तोडक कारवाई करण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे महापालिका विभाग अधिकारी मात्र अशा बांधकामांना महाराष्ट्र प्रादोशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ व ५४ अंतर्गत नोटीस बजावतात. परंतू एकीकडे नोटीसींचा फार्स सुरु असताना दुसरीकडे बेकायदा बांधकामे मात्र सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. याबाबत करावे सुमित्र कडू यांनी बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत बजवाललेल्या नोटीसीबाबत व कारवाईबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता फक्त नोटीसीं बजवालेल्यांची माहिती दिली जाते. परंतू पालिकांनी यातील किती बांधकामावर कारवाई केली गेली तसेच किती कारवाया बाकी आहेत यांची माहिती मिळत नसून कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याबाबत काही माहिती प्राप्त होत नसून बेकायदा बांधकामाबाबू पालिकेने बजावलेल्या नोटीसा फक्त फार्स असल्याची नाराजी सर्वसामान्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> जिवंत झाडांची कत्तल केल्यास दखलपात्र गुन्हा दाखल का नाही? उद्यान विभागाचा शासन निर्णयाला केराची टोपली
नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघापर्यंत अनेक मूळ गावठाणे आहे. तर गावठाण विस्तार परिसरात हजारो बेकायदेशीर बांधकामे उभी आहेत. या गावांच्याभोवती निर्माण झालेल्या बेकायदा इमारतींमध्ये घरे इतर ठिकाणच्या घरापेक्षा स्वस्तात. मिळतात. तसेच भूमाफीया तसेच बेकायदा बांधकाम करणाऱ्यांकडून अशा अनेक इमारती शहरात उभ्या असून मूळ गावठाणांना बेकायदा बांघकामामुळे विद्रुप रुप प्राप्त झाले आहे. शहरातील होणाऱ्या विना परवानगी बेकायदा बांधकामांना महापालिका एमआयडीसी अधिकारी जबाबदार असून या अशा बेकायदा बांधकामांना नुसत्या नोटीसींचा फार्स पूर्ण केला जातो.नवी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत बेकायदा बांधकाम झालेल्या व तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका विभाग कार्यालयाअंतर्गत स्थळ पाहणी केली जाते तसेच बेकायदा बांधकाम आढळून आल्यास त्या आस्थापनाला बेकायदा बांधकामाबाबत नोटीस बजावली जाते. तसेच बांधकाम रितसर परवानगी घेतली असेल व दिलेल्या नियमानुसार बांधकाम केले नसेल तरीही महापालिका अतिक्रमण विभागामार्फत संबंधित व्यक्तिला नोटीस बजावली जाते. परंतू शहरात दिघा ते बेलापूर विभागात हजारे बेकायदा बांधकामे असून त्यांना मात्र नोटीसींचा दाख दाखवून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप पालिका अतिक्रमण विभागावर केला जात आहे.
हेही वाचा >>> ‘मी मोठा शेठ’ म्हणत प्रवाशांची फसवणूक, बघता बघता दागिणे लुटायचे; लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना बेड्या
शहरातील बेकायदा बांधकामाबाबत नोटीस बजावल्यानंतर नोटीस मिळाल्यापासून ३२ दिवसाच्या आत संबंधित बेकायदा विनापरवाना काम निष्कसित केले नाही .तर पालिका हे काम निष्कसित करेल व त्याचा खर्च संबंधित बेकायदा बांधकाम करणाऱ्याकडून वसूल करण्यात येईल असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात येते. परंतू अशा बेकायदा बांधकामांकडे पालिका दुर्लत्र करत असून याअंतर्गत वसुलीचा धंदा जोरात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये गुंठ्यांला लाखोंचा भाव कारवाई न करण्यासाठी घेतली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नवी मुंबई शहराला आलेले वेगळे महत्व , नव्याने विकसित विमानतळ त्यामुळे जागांचे बाब गगनाला भिडले असून दुसरीकडे बेकायदा बांधकामेही जोरात सुरु असल्याची चर्चा आहे.त्यामुळे महापालिकेने शहरतील सर्व बेकायदा बांधकामाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता असून कारवाई न करण्यासाठी लाखो रुपये वसुल केले जात असल्याचे चित्र आहे.
याबाबत पालिका अतिक्रमण विभाग उपयुक्त अमरीश पटनिगिरे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात एकीकडे मूळ गावठाणांनाभोवती मोठया प्रमाणात बेकायदा बांधकामे होत असून पालिकेच्यावतीने फक्त नोटीसींची माहिती दिली जाते.परंतू कारवाई का झाली नाही.याबाबत स्पष्टता नाही.तसेच पालिका विभाग कार्यालयामार्फत ज्या अधिकाऱ्याने कार्यवाही केली नाही त्यावर काय कारवाई केली गेली याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
सुमित्र कडू, शिवसेना पदाधिकारी
नवी मुंबई शहरात असणाऱ्या बेकायदा बांधकामांना पालिका व सरकारी आस्थापनांकडूनच अभय दिले जाते असल्याचा आरोप करण्यात येत असून ३२ दिवसात बेकायदा बांधकाम निष्कसित न केल्यास गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र पालिकेमार्फत संबंधित पोलीस निरिक्षकांना दिले जाते. परंतू अद्याप शहरात सुरु असलेल्या बेकायदा बांधकामाबाबत इत्यभूत माहिती उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
संबंधित विभाग कार्यालयामार्फत मागवण्यात आलेली माहिती देण्यात आली असून काही ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.तसेच काही ठिकाणी अतिक्रमण हटवण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे पालिकेच्या मार्फत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याबाबत पत्र दिले जाते तसेच वकीलामार्फत न्यायालयीन प्रक्रियाही पार पाडली जाते.
डॉ.मिताली संचेती, सहाय्यक आयुक्त बेलापूर विभाग कार्यालय