नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे जोरात * अतिक्रमणाबाबतची सर्वच विभागातील माहिती जनतेसमोर मांडण्याची मागणी
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे नवी मुंबई शहरातील मूळ गावठणाभोवती या अनधिकृत बांधकामांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तोडक कारवाई करण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे महापालिका विभाग अधिकारी मात्र अशा बांधकामांना महाराष्ट्र प्रादोशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ व ५४ अंतर्गत नोटीस बजावतात. परंतू एकीकडे नोटीसींचा फार्स सुरु असताना दुसरीकडे बेकायदा बांधकामे मात्र सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. याबाबत करावे सुमित्र कडू यांनी बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत बजवाललेल्या नोटीसीबाबत व कारवाईबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता फक्त नोटीसीं बजवालेल्यांची माहिती दिली जाते. परंतू पालिकांनी यातील किती बांधकामावर कारवाई केली गेली तसेच किती कारवाया बाकी आहेत यांची माहिती मिळत नसून कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याबाबत काही माहिती प्राप्त होत नसून बेकायदा बांधकामाबाबू पालिकेने बजावलेल्या नोटीसा फक्त फार्स असल्याची नाराजी सर्वसामान्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.