स्वच्छ भार तअभियानात नवी मुंबई महानगरपालिकेचे काम गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेचे नाव देशपातळीवर वरच्या क्रमांकात आहे गेल्यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेचा देशात तिसरा तर महाराष्ट्रात सातत्याने प्रथम क्रमांक येत आहे. एकीकडे शहर स्वच्छ अभियान राबवताना या अभियानाच्या माध्यमातून शहरात बेलापूर ते दिघा विभागात विविध प्रकारच्या जनजागृतीसाठी फलक लावले जातात. परंतू याच फलकबाजीचे दर अवाजवी असल्याचे चित्र असून स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीतूनच आर्थिक हातसफाई केली जाते की काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आधुनिक व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वेगवान बदल होत असून सुरवातीला विविध कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम यांसह विविध कंपन्यासह जवळजवळ सर्वच क्षेत्रात प्रसिध्दीच्यासाठी जाहीरात माध्यमाचा वापर केला जातो. अगदी सुरवातीला कापडी बॅनरचा वापर सगळीकडे पाहायला मिळायचा. हाती कलाकारांनी, पेटंर यांनी लिहलेले फलक पाहायला मिळायचे परंतू आता डिजीटल जमान्यात फलकबाजीलाही वेगळे रुप आले आहे. नवी मुंबई शहरात पालिकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची व जनजागृतीसाठी जाहीरात केली जाते. स्वच्छ सर्वेक्षणातही अशा विविध जाहीरातींचा वापर केला जातो. एकीकडे नवी मुंबई शहरात सर्वच विभागात आकर्षक चित्र, शब्दांकने, रेखाटलेली पाहायला मिळतात.तर विविध विभागात स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरीकांच्या जनजागृतीसाठी जाहीरात फलक लावले जातात.तसेच स्वच्छता सर्वेक्षणाच्यासाठी विविध रॅली, तसेच दर रविवारी ,स्वच्छताकर्मींच्या सन्मानार्थ नागरीकांच्या हाती झाडू असे अनेक उपक्रम पालिकेच्या माध्यमातून होतात.यामध्ये जनजागृती व प्रसिध्दी हा मोठा घटक असून पालिका ही फलकबाजी करण्यासाठी निविदा मागवते.
हेही वाचा >>> दिरंगाईमुळे करंजा मच्छिमार बंदर कंत्राटदाराला साडेतीन कोटी रुपयांचा दंड; मार्च अखेर पर्यंत बंदराचे काम पूर्ण करण्याचे आदेश
या कामासाठी मागवलेले तर बाजारातील दरापेक्षा चार पटीने अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्याच अर्थात सरकारी जाहीरातींसाठी आपल्याच शहरात पालिकेकडून जागेसाठी भाडे आकारणी केली जात नाही. तर दुसरीकडे शहरात खासगी कंपन्या व नागरीकांना राजकीय व्यक्ति तसेच कंपन्या यांना शहरात जाहीरात करताना पालिकेने ठिकाणे निश्चित केली आहेत .तेथेच पालिकेच्या परवानगीने व ठरलेल्या दराने आकारणी केली जाते. परंतू स्वच्छता अभियानासाठी विनेल व फ्लेक्स बनवण्यासाठीचे दर अवाजवी असल्याचे चित्र आहे. शहरात फ्लेक्ससाठीचा दर हा १८ ते २० रुपये प्रती.चौ.फुटाला असताना पालिकेने मागवलेले दर हे ७९.३५ रुपये प्रती फुटाला असून जवळजवळ हे दर ४ पटीने अधिक असल्याचे दिसून येत आहे. तसेच विनेल अर्थात लाईट असलेले व उंच ठिकाणी लावलेले फलकासाठी व साध्या फ्लेक्स जाहीरातीसाठी एकच दर कसे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाच्या नावाखाली ही हातचलाखीने केलेली हातसफाई आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने या फलकबाजीसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेबाबत संशयची सुई फिरु लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेने फलकबाजी अर्थात शहरात होत असलेल्या व शहराला देशात नावलौकीक मिळवणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी करताना सातत्याने वरचा क्रमांक मिळवण्यासाठी पालिका व नागरीकही तेवढेच प्रयत्न करत असतात. परंतू फलकबाजी करताना त्याच फलकबाजीतून किंवा नागरीकांच्या उद्बोधात्मक जनजागृतीसाठी मागवलेल्हाया निविदावरुन तिजोरीची हातसफाई होत असल्याची शंका आहे त्यामुळे याबाबत योग्यती चौकशी होणे गरजेचे आहे. समीर बागवान, शिवसेना पदाधिकारी
नेरुळ येथे नवरंग नावाचे फ्लेक्स बनवून देण्याचे काम करत असून बॅनरच्या आकारानुसार दर आकारणी केली जाते. परंतू प्रत्येक प्रति.चौ.फुटाला १८ ते २० रुपये आकारले जातात. – बाबुभाई, नवरंग फ्लेक्स नेरुळ
पालिकेने स्वच्छता विषयक माहिती असलेल विनेल तसेच फ्लेक्स बॅनर्स डिझाईनसह तयार करुन लावण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेबाबत व त्यांच्या दराबाबत योग्य ती माहिती घेण्यात येईल.
डॉ.बाबासाहेब राजळे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन