नवी मुंबई : महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची तयारी सुरूकेली असून कचरा वाहतूक व संकलन लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच या निविदेद्वारे कचरा वाहतुकीसाठी अन्य मोठ्या डम्परबरोबरच काही विद्युत वाहनांची खरेदी प्रक्रिया केली जाणार आहे. कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार जुन्याच ठेकेदाराला नव्याने दिलेली मुदतवाढ मार्च २०२४ अखेरपर्यंत आहे. तसेच कचरा निविदे प्रक्रियेबाबत महापालिकेने मागवलेला प्रकल्प अहवाल अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने दिला आहे. त्यामुळे काही दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराला काम दिले होते. परंतू संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने याच ठेकेदाराला कामासाठी मुदतवाढ दिली असून ती सातत्याने वाढवली. आता २०२४ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याने कचरावाहतुक निविदेला मार्चपर्यंत अंतिम स्वरूप देऊन नव्या ठेकेदाराची नियुक्ती मार्च अखेरपर्यंत करावी लागणार आहे. नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मे. ए. जी. एनव्हायरो ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?

हेही वाचा : नवी मुंबई : २६ नोव्हेंबरला होणाऱ्या मॅरेथाॅन मार्गात बदल

पालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा कचरा वर्गीकरणाची व्याप्ती नव्या निविदा प्रक्रियेत वाढवली जाणार आहे. विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचा पालिकेचा मानस आहे. ओला व सुका कचºयाच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच सुका व घातक कचऱ्याच्या वर्गीकरणाबरोबरच नव्याने प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अशा कचºयाचे वर्गीकरण करून कचरा संकलन केले जाणार आहे. प्रथमच विजेवर चालणाºया छोट्या वाहनांचा वापर करण्याबाबतही विचार केला जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

हेही वाचा : उरण : चिरनेर शेतकऱ्यांनी बांधले दोन वनराई बंधारे, पावसाळ्यानंतरच्या पिकांना मिळणार पाण्याचा ओलावा

पालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पाहत असल्याने नव्याने काढण्यात येणाºया कचरा वाहतूक व संकलनाबाबत पालिकेने व्यापक नियोजनाचे लक्ष ठेवले आहे. कचरा वाहतूक व संकलन निविदा कोट्यवधींच्या घरात जाणार असून शहराला स्वच्छतेबाबत मिळालेला नावलौकीक टिकवण्यासाठी व सातत्याने वाढवण्यासाठी पालिका योग्य ती खबरदारी घेणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

“कचरा वाहतूक व संकलनासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकल्प अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे. नव्या निविदेबाबत वेगवान प्रक्रिया केली जाणार आहे. यात विद्याुत वाहनेही खरेदी केली जाणार आहेत.” – राजेश नार्वेकर, आयुक्त

Story img Loader