नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानात स्वतःला झोकून दिले आहे. सर्वत्र स्वच्छता ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शहरातील मोकळ्या भूखंडावर किंवा इतरत्र ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर कारवाई करण्यासाठी डेब्रिज भरारी पथक ही आहेत. मात्र शहरातील काही मोकळ्या भूखंडावर आजही राडारोडा, कचऱ्याचे ढीग निदर्शनास पडत आहेत. कोपरखैरणे से. ४ येथील आदिवासी विकास विभागासाठी राखीव असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी छोट्या छोट्या गोणीतून राडारोडा टाकल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच स्वच्छता राखा, कचरा टाकू नये असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. तरीदेखील कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

नवी मुंबई शहरात सर्वत्र स्वच्छता राखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांच्या सहभागाने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे . परंतु महानगरपालिकेकडून मोकळ्या भूखंडावरील स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक जरी स्वच्छ ठेवला तरी अंतर्गत मोकळ्या भूखंडावरील कचरा तसेच अंतर्गत रस्त्यावरील कचरा हे स्वच्छता सर्वेक्षणात बाधा आणण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत भिंतीवर दरवर्षी ही रंगरंगोटी केली जात आहे. कोपरखैरणे से. ४ येथील आदिवासी विकास विभागासाठी राखीव असलेल्या या भूखंडालगत जाळी देखील बांधण्यात आलेली आहे. परंतु हा मोकळा भूखंड कचऱ्याच्या विळख्यात अडकला आहे. याठिकाणी महापालिकेचा स्वच्छता राखा, राडारोडा, कचरा टाकू नये असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. तरी देखील हा परिसर अस्वच्छ झाला आहे.

हेही वाचा… मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचारा विरोधात माथाडी कामगारांचे निषेध आंदोलन

आगामी स्वच्छतेत शहराला पहिल्या क्रमांकाचे नामांकन मिळावे म्हणून महापालिकेने कंबर कसली आहे. आज शहारत बऱ्याच ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी डेब्रिज माफियांकडून राडारोडा टाकला जातोय .वास्तविक नवी मुंबईत राडारोडा टाकन्यास मनाई आहे. डेब्रिज माफिया शहारत कुठेही डेब्रिज खाली करतात आणि शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. नवी मुंबई महानगरपालिका शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग या ठिकाणी सर्व उपाययोजना करून स्वच्छता आणि परिसर आकर्षक करण्यात मग्न आहेत. परंतु शहरातील अंतर्गत स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे . शहरातील अंतर्गत स्वच्छतेकडे ही लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा त्याचा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील नामांकांनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Story img Loader