नवी मुंबई : सद्यस्थितीत वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात कामाशिवाय घराबाहेर पडू नये व स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले की माणसाच्या शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे काम करेनाशी होते आणि उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ व उलट्या होणे, डोके दुखणे, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, प्रसंगी आकडी येणे अशी विविध प्रकारची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी, रुग्णालयाशी संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.

Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Police patrol J J Hospital, Mumbai,
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलीस घालणार गस्त
Security guards in health department not get salaray from three month mumbai news
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांची सुरक्षा वाऱ्यावर ! तीन महिने सुरक्षा रक्षकांना पगारच नाही…
Mumbai, mobile clinic, Maharashtra Health Department , luxury vehicles, health department,
तीन कोटींच्या फिरत्या आरोग्य दवाखान्याचा वार्षिक देखभाल खर्च १३८ कोटी! ७६ फिरत्या दवाखान्यांसाठी १० वर्षात लागणार २००० कोटी
Monkeypox, monkeypox virus india,
सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था

हेही वाचा >>> चंद्रपुरात ४३.६ अंश तापमान, राज्यात सर्वाधिक

सध्या तापमानातील प्रचंड वाढीमुळे उष्णतेचे आजार व उष्माघात टाळण्यासाठी तहान लागलेली नसली तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे, हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल, छत्री अथवा टोपी, बूट अथवा चप्पल यांचा वापर करावा तसेच प्रवास करताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवावी असेही आवाहन करण्यात येत आहे. तर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नेरुळ येथील मिनाताई ठाकरे रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live Today : “काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नाही”, नाना पटोले यांचं विधान

उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर टोपी अथवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे जाणवल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक अशी पेये नियमित घ्यावीत. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या  दरम्यान योग्य ती काळजी घ्यावी. खेळाच्या तासातील मैदानी खेळ सकाळी ९.३० च्या आधी संपवावेत असे सूचित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आऊटडोअर ॲक्टिव्हिटी सायं. ५ नंतर ठेवाव्यात जेणेकरून सुर्यप्रकाशाची तीव्रता कमी जाणवेल. तसेच दर तासाला पाणी पीने, शाळांमध्ये टोपी घालणे अनिवार्य करावे आणि फळांचे सेवन वाढवावे असेही सूचित करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> करोनाची संख्या शहरात वाढतच आहे, ५ दिवसाच्या विलगीकरणाच्या नियमाचे पालन करा पालिकेचे आवाहन

उन्हाचा त्रास होऊ लागल्यास तात्काळ नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राशी अथवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. याठिकाणी उष्णलहरी बाधित रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याची व त्यासाठीचा आवश्यक औषध साठा करून ठेवण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत आरोग्य विभागाला देण्यात आलेले आहेत.महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार उष्माघाताच्या रूग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे विशेष उपचार कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.

उच्च तापमानामुळे उष्णतेच्या आजाराचा धोका असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी. उष्णतेचा वा उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवल्यास त्वरित महानगरपालिकेच्या रुग्णालयाशी किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

-राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त