नवी मुंबई : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात २७ जणांचा मृत्यू झाला होता. याचे पडसाद नवी मुंबईतही उमटले असून मुस्लिम समाजाच्या वतीने या अतिरेकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या अतिर्केच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटक नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नवी मुंबईतील मुस्लिम समाजातील नागरिक वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र जमले होते.
यावेळी अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. असेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील व्यक्ती उपस्थित होत्या. यात इकबाल शेख,माजी परिवहन सभापती-अन्वर शेख, माजी नगरसेवक-जब्बार खान, समीर बागवान-माजी परिवहन सदस्य, रउफ शेख,मुबीन काझी, दिलावर नळबंद,आदी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.