नवे पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांची माहिती; पदभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठकांना सुरुवात

नवी मुंबई</strong> : लाच लुचपत विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असणारे बिपीन कुमार यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर सायबर गुन्हेगारी राखण्याबरोबर वाहतूक कोंडी, महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बिपीन कुमार यांनी गुरुवारी दुपारी संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली असून तत्कालीन आयुक्त संजय कुमार यांच्यासमवेत बैठक घेत शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि करोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर अन्य विभागांच्या पोलीस उपायुक्तांची बैठक घेत प्रत्येक विभागाची सविस्तर माहिती घेतली. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, करोनाकाळातही मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे. पोलिसांचे आरोग्यही उत्तम राहील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हेगारी हे मोठे आव्हान आहे. साखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरीचे प्रमाणही अधिक असून त्याला आळा घालण्यास प्राधान्य देण्यात येईल.

सहआयुक्तपदी जय जाधव

आयुक्तांच्या बदलीबरोबरच सह आयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. मात्र अद्याप नवीन सहआयुक्त जय जाधव रुजू झालेले नाहीत. जय जाधव हे या पूर्वी सुरक्षा मंडळावर सहसंचालक म्हणून काम करीत होते. विद्यमान सहआयुक्त राजकुमार वटकर यांची बदली मुंबईत सहआयुक्त प्रशासन विभागात झालेली आहे.

शहरात विविध ठिकाणी ठरावीक वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. याबाबत लवकरच आराखडा ठरवून काम सुरू करण्यात येणार आहे.  सायबर गुन्हेगारी हे मोठे आव्हान असून त्याची व्याप्ती जागतिक असल्याने गुन्हेगारांपर्यंत पोहचणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे जनजागृतीबरोबरच गुन्ह्यंचा मागोवा घेण्यावर भर देण्यात येणार आहे.

बिपीन कुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>

Story img Loader