नवी मुंबईतील सी उड येथिल खाजगी शाळेच्या स्कुल व्हॅनला पाठीमाहून येणाऱ्या एका कारने जोरदार धकड दिली. यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. आज (मंगळवारी) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सी उड पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुला वर हा अपघात झाला . या अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही .

हेही वाचा >>> नवी मुंबई शहरातील उद्यानांच्या वेळांबाबत धोरणात्मक निर्णय ? नागरीकांकडून सातत्याने उद्यानांच्या वेळ वाढवून देण्याची मागणी

भरघाव गाडीने स्कुल व्हॅनला पाठीमागून धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर बघ्यांच्या गर्दीने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.  अग्निशमन दलाच्या मदतीने गाड्या बाजूला करण्यात आल्या. आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. अशी माहिती सी उड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.