नवी मुंबई : एनएमएमटीत असणारी ट्रॅकिंग प्रणाली जुनाट असल्याने नव्याने दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसची वारंवारिता (फ्रिक्वेंसी) जुळत नाही. परिणामी या बस एनएमएमटी ॲपवर तसेच थांब्यावरील डिजिटल फलकावरही दिसत नाहीत. प्रणालीचे आधुनिकीकरण गरजेचे आहे मात्र निधी तांत्रिक प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एन.एम.एम.टी सेवेत गेल्या काही वर्षांपासून ट्रॅकिंग प्रणालीत चुका होत असल्याचा आरोप होत आहे. काही वर्षांपासून १०० बस थांब्यावर डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. यावर बस कधी येणार व सध्या त्या नेमक्या कुठे आहेत हे दर्शविले जाते. सद्यस्थितीत हे फलक वारंवार खराब होत आहेत. तसेच अनेक बसमध्ये ट्रॅकिंग प्रणाली व्यवस्थित काम करीत नसल्याने त्या बसची माहिती बस थांबा किंवा ॲपवर दिसत नव्हती. करोना काळानंतर अनेक महिने ॲप बंद पडला होता. काही महिन्यांपूर्वी तो पूर्ववत करण्यात आला.
हेही वाचा :खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरण; बांधकाम विकासकाविषयी प्रशासन अनभिज्ञ
हेही वाचा : खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरण; बांधकाम विकासकाविषयी प्रशासन अनभिज्ञ
सुमारे दीड महिन्यापूर्वी एनएमएमटीच्या ताफ्यात नव्याने २५ गाड्या दाखल झाल्या आहेत. या सर्व गाड्या इलेक्ट्रिक बस असून या बसमध्ये ४ जी आणि ५ जी ही आधुनिक प्रणाली आहे. त्यामुळे त्याला ट्रॅकिंग प्रणाली वर जोडायचे असल्यास जोडणारी आणि कार्यरत असणारी प्रणालीसुद्धा आधुनिक असणे गरजेचे आहे. मात्र सध्या एनएमएमटीकडे २ जी वर चालणारी आयटीएमएस ( इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेन्ट सर्व्हिस) ही प्रणाली आहे. ही प्रणाली कालबाह्य असल्याने नवीन प्रणालीची फ्रिक्वेंसी जुळत नाही. परिणामी नव्याने दाखल झालेल्या बसबाबत माहिती डिजिटल फलक व ॲप वर दिसत नाहीत.
निधीसाठी पाठपुरावा
आयटीएमएस (इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मँनेजमेंट सिस्टीम ) ९ कोटी खर्च करून २०१८ मध्ये कार्यान्वित झाली. अद्ययावतीकरणाच्या निधीसाठी एनएमएमटीने एमओआरटीएच (सडक परिवहन राज मार्ग मंत्रालय) यांना अनेकदा पत्र पाठवले असून दोन वेळा स्मरण पत्रही पाठवलेले आहे. मात्र त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : जुहूगावातील ज्येष्ठ विरंगुळा केंद्राच्या प्रतीक्षेत; केंद्राला योग्य जागा सापडत नसल्याची पालिकेची सबब
प्रवाशांन मनस्ताप
नव्याने दाखल झालेल्या बस या १२५ क्रमांकाने मार्गावर धावत आहेत. सीबीडी ते बोरीवली आणि खारघर ते बोरीवली असा हा मार्ग असून या मार्गाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच मार्गावर जाणारे प्रवासी सर्वाधिक ॲपचा वापर करतात तर डिजिटल फलकाचाही फायदा मोठ्या प्रमाणात होतो. आता मात्र ॲप आणि फलकावर बसबाबत माहिती मिळत नसल्याने मनस्ताप होतो असा दावा प्रवीण लोढा या प्रवाशाने व्यक्त केला.
प्रणालीचे वेळोवेळी आधुनिकीकरण करणे क्रमप्राप्त असतानाही प्रशासनाकडून लक्ष दिले न गेल्याने सुरुवातीपासून २ जी बेस प्रणाली आहे, तीच आजतागायत वापरात येते. आता वरचेवर आधुनिक पद्धती येत असताना त्याचे अपग्रेडेशन आवश्यक आहे. ते करण्याबाबत उदासीनता दिसून येते. याचा त्रास प्रवाशांना होतोच मात्र शासनाने अशा प्रणालींना दिलेले पैसेही वाया जातात.
समीर बागवान, माजी परिवहन सदस्य
हेही वाचा : करंजाडेवासीय ९ तास विजेविना
एमओआरटीएचने नुकताच प्रतिसाद दिला आहे. लवकरच याबाबत सादरीकरण केले जाणार असून त्यानंतर निधी लवकर मिळेल अशी आशा आहे.
योगेश कडुसकर ,व्यवस्थापक, एनएमएमटी