लोकसत्ता, पूनम सकपाळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात वाढ होत असून शनिवारी बाजारात कांद्याने पुन्हा उसळी घेतली आहे. मागील आठवड्यात १८ते २१ रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा आता २६ ते २७ रुपयांवर वधारला आहे. तर किरकोळ बाजारात ३०-३५ रुपयांनी विक्री होत आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. जानेवारी- फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे साठवणूकीच्या कांदा ही खराब झाला आहे.
हेही वाचा >>> मानखुर्द – नेरुळ अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक
बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. अवघा ३०% उच्चतम प्रतिचा कांदा दाखल होत असून परिणामी उच्चतम प्रतिच्या कांद्याला उठाव असल्याने दर वाढ होत आहे. एपीएमसीत शनिवारी १०६गाडी आवक झाली आहे.मात्र सर्वात चांगल्या प्रतिच्या कांद्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत असून पुढील कालावधीत दर आणखीन वधारण्याची शक्यता आहे. एपीएमसी बाजारात आधी प्रतिकिलो १८-२१ रुपयांनी उपलब्ध असलेले कांदे आता २६-२७रुपयांनी विक्री होत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो ५ते ६ रुपयांनी तर किरकोळ बाजारात १०रुपयांची वाढ झाली आहे.
पावसाळी लाला कांद्याची आद्यप लागवडच नाही एपीएमसी बाजारात पावसाळी लाला कांदा दाखल होताच कांद्याचे दर आवाक्यात येतात. सध्या पावसाने दडी मारली असून पावसाळी कांद्याच्या उत्पादनाला फटका बसत आहे. त्यामुळे अद्याप पावसाळी लाल कांद्याची लागवडच झाली नाही. जून-जुलै मध्ये पावसाळी कांद्याची लागवड होते. मात्र सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अद्याप लागवड झाली नसल्याने यंदा एक ते दोन महिन्यांनी नवीन कांद्याचा हंगामाला विलंब होणार आहे, अशी माहिती घाऊक व्यापारी महेश राऊत यांनी दिली आहे.