नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस विभागात पोलिसांकडेही वरिष्ठ लक्ष देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. आपल्या अधिकारी कर्मचाऱ्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी परिसर प्रसन्न राहावा याची काळजी घेतली जात असून याचेच एक पथदर्शक उदाहरण म्हणजे सीबीडी पोलीस ठाणे आवारात ओपन जिम आणि छोटेखानी बॅडमिंटन कोर्ट उभे करण्यात आले आहे. पोलीस म्हणजे कायम टीकेचा धनी असतो. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे मात्र तरीही शहरात कुठेही काहीही गडबड झाली, अपघात झाला, सिग्नल तोडले, बेशिस्त गाडी पार्क केली अशा नागरिकांनी केलेल्या चुकांना सुद्धा पोलिसांनाच जबाबदार धरले जाते. वाढती लोकसंख्या त्यासोबत वाढती गुन्हेगारी त्यात कमी मनुष्यबळ त्यामुळे तपास कामात येणारा ताण आणि त्या पाठोपाठ कायम तणावग्रस्त वातावरणात काम करावे लागते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्य ढासळते. त्यातून आत्महत्या, कमी वयात हृद्यविकाराने मृत्यू, अशा अनेक घटना घडतात. उच्च रक्तदाब, थारॉईड, मधुमेह तर बहुतांश पोलिसांना असतोच. या परिस्थितीची दखल अति उच्च अधिकारी घेताना दिसत नाहीत. याला अपवाद ठरले आहे ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा