अनेक वर्षे केवळ चर्चाच; सिडकोचा प्रकल्प यशस्वी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : ‘सिमेंटचे शहर’ अशी असलेली ओळख पुसत नवी मुंबई महापालिकेने अनेक पर्यावरणपूरक धोरणे राबवीत नवी मुंबईची ‘उद्यानांचे शहर’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. मात्र फुलपाखरू उद्यानाचा पालिकेला विसर पडलेला दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेला हा प्रकल्प अद्याप कागदावरच आहे.

सप्टेंबर महिना हा फुलपाखरांचा म्हणून ओळखला जातो. चार महिनांच्या पावसाळ्यानंतर या महिन्यात सर्वत्र हिरवाई पसरलेली असते. पावसाचे परतीचे दिवस सुरू होत ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. हे वातावरण फुलपाखरांसाठी पोषक समजले जात असून हा त्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो.

सिडकाने ‘अर्बन हट’ येथे फुलपाखरांसाठी खास उद्यान विकसित केले आहे. फुलपाखरे आकर्षित होतील अशा वनस्पती या ठिकाणी लावल्या असून २७ जातींच्या फुलपाखरांचा वावर या ठिकाणी असल्याच्या नोंदी आहेत. तसेच सीबीडी येथील आर्टिस्ट वसाहतीमध्येही सिडकोच्या मदतीने लोकसहभागातून असे उद्यान विकसित करण्यात आले आहे. या ठिकाणीही फुलपाखरांचा वावर वाढला आहे. अर्बन हटमध्ये सिडको विविध प्रदर्शने भरवीत असते. ही प्रदर्शने पाहण्यासाठी देशभरातून कुटुंबीयांसह लोक येत असतात. यात लहान मुलांचाही समावेश असतो. प्रदर्शनात वस्तू खरेदीसह फुलपाखरांच्या सहवास मिळत असल्याने मुलांमधील फुलपाखरांबाबतची जिज्ञासा वाढत आहे. येथील अनुभव पाहता नवी मुंबईकरांसाठीही पालिकेने आपल्या उद्यानांमध्ये फुलपाखरांना पोषक वातावरण निर्माण करावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. २०१९मध्ये पालिकेने यासाठी तसे नियोजन करीत नेरुळ येथील उद्यानांत फुलपाखरू उद्यानांचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र यावर पुढे काहीही झालेले नाही. हा प्रकल्प अद्याप कागदावरच राहिला आहे.

पावसाळा संपल्यानंतर ऊन पडताच मोठ्या प्रमाणात फुलपाखरे आढळून येतात. ‘अर्बन हट’मध्ये तीन ठिकाणी फुलपाखरांना पोषक वातावरण निर्माण केल्याने या ठिकाणी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा वावर वाढला आहे. – विक्रमान नायर, अर्बन हट व्यवस्थापक

फुलपाखरू उद्यानासाठी २०१९ मध्ये प्रस्ताव तयार केला होता. मात्र हा प्रस्ताव पुढे सरकला नाही. आजच्या पिढीला निसर्गाबाबत कुतूहल व आकर्षण निर्माण करण्यासाठी याची गरज असून महापालिका याबाबत सकारात्मक पाऊल नक्कीच टाकेल. – मनोज महाले, उपायुक्त, उद्यान विभाग