नवी मुंबई : तरूणांमध्ये क्रेझ असलेल्या रॉयल इनफिल्ड बुलेट व बजाज पल्सर २२० या मोटारसायकल वाहनांची चोरी करणाऱ्या त्रिकुटास नेरूळ पोलीस पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी एकुण १९ लाख ५० हजार रुपयांच्या २० बाईक्स जप्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निमेश सोपान कांबळे, (वय २१ वर्षे ) , प्रथमेश राजु सपकाळ, (वय २१ वर्षे)   गौरव आनंदा कदम (वय १९ ) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नवी मुंबईत बाईकच्या चोरीत वाढ होत असल्याने या चोरट्यांना पकडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष स्थापन करण्यात आले आहेत.

हेही वाचा… नवी मुंबईत खोदकामे थांबेनात, पावसाळापूर्व कामे हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत असल्याने नागरिक त्रस्त

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्राचं सरकार स्थिर राहणार की अस्थिर? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान महाबळेश्वर नजीक मेढा येथे एक बुलेट बेवारस अवस्थेत सापडली . स्थानिक पोलिसांनी दुचाकी क्रमांकावरून गाडीचे मालक शोधले व या बाबत नवी मुंबई पोलिसांना माहिती दिली. ही बुलेट ज्या ठिकाणाहून चोरी झाली होती . त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि खबरी असा सर्व स्तरातून तपास करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. त्यांची चौकशी करून तब्बल २० गुन्हे उकल झाली आहे. यातील काही गाड्या या टोकन देऊन विकत घेतल्या मात्र नंतर गाडी इतरांना विकण्यात आल्या. आरोपीकडून अजून गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai police arrested bullet stealing trio 20 bikes worth of 19 lakh 50 thousand seized asj
Show comments