पनवेल : कोपरा गावातील भाड्याच्या खोलीत राहणा-या चार बांगलादेशीय नागरीकांना नवी मुंबई पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीसांनी शनिवारी ताब्यात घेतले. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोपरा गावातील संजय ठाकूर यांच्या खोलीमध्ये भाड्याने बांगलादेशातील नागरीक राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाल्यानंतर खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध आणि स्थानिक पोलीसांचे संयुक्त पथक स्थापन करुन संजय ठाकूर यांच्या घराजवळ शनिवारी सापळा रचला. पोलीसांच्या पथकाने यावेळी भाड्याच्या खोलीत राहणा-या ३७ वर्षीय अमिषा कमाल काजी, १८ वर्षीय शर्मिन कमाल काजी, ४० वर्षीय राणी किमारुल शेख, २७ वर्षीय सैफ्फुला अहमद अली खान यांना ताब्यात घेतले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या महिला व तरुणींकडे चौकशी केल्यावर खारघर व परिसरात या घरकाम करत असल्याचे समजले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai police detained four bangladeshi nationals living in rented room on saturday sud 02