नवी मुंबई : नवी मुंबईत मागील दोन वर्षात ऑनलाईन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून या चोरट्यांनी उच्चशिक्षित आणि धनिकांना आपले लक्ष्य केले आहे. कोट्यावधी रुपयांची चोरी ऑनलाईन चोरीचे सत्र सूरु असून दिवसाला एकतरी चोरीच्या घटना नोंद केल्या जात आहेत. मात्र या चो-या रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस असमर्थ ठरले असून गुरुवारी नवी मुंबई पोलीसांनी स्वताच नवी मुंबई पोलीसांच्या नावाने बनावट एक्स खाते सूरु केलेल्या व्यक्ती विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यामुळे ऑनलाईन चोर हे पोलीसांवर शिरजोर झाल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई पोलीस दलाचे परिवर्तन काळानुरुप आधुनिक पोलीस दलात करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कंबर कसली आहे. यासाठी आयुक्त भारंबे यांनी काही महाविद्यालयांमधील सायबर सूरक्षा विषयाच्या प्राध्यापकांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे शिकवणीवर्ग सूरु करण्याचा प्रयोग केला. प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान दोन तरी अधिकारी आणि चार कर्मचा-यांना तरी सायबर सूरक्षेचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचा हा प्रयोग नवी मुंबईत पहिल्यांदा करण्यात आला. नवी मुंबई पोलीस दलाला आयुक्त भारंबे यांच्याकाळात पहिल्यांदा सायबर सेल मध्यवर्ती पोलीस ठाणे सूरु झाले. वर्षभरात या सायबर पोलीस ठाण्यात सुद्धा ऑनलाईन चोरी व अपहाराचे २२१ गुन्हे दाखल आहेत. मोठमोठ्या उद्योगपती किंवा नामांकित व्यक्तीच्या नावाने ही चोरी भामट्यांकडून केली जाते. गुरुवारी सायबर सूरक्षा पोलीस ठाण्यात पोलीसांनी दिलेल्या फीर्यादीमध्ये मागील चार वर्षांपासून एका अनोळखी भामट्याने एक्स या अॅपवर नवी मुंबई पोलीस दलाचे आणि पोलीस आयुक्तांच्या नावाचे बनावट खाते सूरु केल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. तसेच या भामट्याने इन्स्टाग्रामवर सुद्धा नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाने बनावट खाते सूरु केले आहे.

Coldplay Ticket, BookMy Show Complaint,
कोल्डप्ले तिकीट कथित काळाबाजारी प्रकरण : बुकमाय शोच्या तक्रारीवरून ३० संशयितांविरोधात गुन्हा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
reporter abused while reporting
पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना दमदाटी; देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
father raped his fourteen year old daughter
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास बारा वर्षाची सक्त मजुरी !
Ashok Chakra, broom, Nagpur, Nitin Raut,
अशोक चक्रावर झाडूच्या चित्रावरून वाद, कॉंग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले…
no decision has been taken on mechanism to fill pothole in City Post premises after 24 hours
‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!
ED seized assets worth Rs 43 crore 52 lakh in case of defrauding bank group
१,४३८ कोटींचे बँक फसवणूक प्रकरण: ईडीकडून ४३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हे ही वाचा…उरणमध्ये शारदोत्सवात आदिशक्तीचा जागर

पोलीसांच्या सायबर सूरक्षा विभाग नियमितपणे समाजमाध्यमांवरील विविध संकेतस्थळ आणि विविध समाजमाध्यमांच्या अॅपवर पोलीसांच्या नावाने नागरिकांना फसविण्यासाठी अशी बनावट खाती सूरु आहे का याचा मागोवा घेत असतात. याच मागोवा घेत असताना पोलीसांच्या सायबर विभागाला संबंधित खाती आढळल्याने पोलीसांनी स्वताहून या प्रकरणी गुन्हा नोंदविला. या खात्यावर कोणत्याही नागरिकाची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीसांकडे कोणी केली नव्हती अशी माहिती सायबर सूरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन कदम यांनी दिली.