नवी मुंबई : नॅशनल पोलीस अकॅडमी हैद्राबादला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्शवभूमीवर केंद्रीय मंत्रालयाने सर्व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी फिट लाईव्ह ७५ हा आरोग्यदायी उपक्रम सुरू केला आहे, नवी मुंबईमध्ये देखील या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. नवी मुंबई पोलीस दलातील ६५० अधिकारी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ५ किलोमीटरच्या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सदर उपक्रम आजपासून पुढील ७५ दिवस चालणार आहे. देशभरातील सर्व पोलीस कर्मचारी या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील साडेसहाशे पोलीस कर्मचारी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. अशी माहिती मुख्यालय पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दिली.

हेही वाचा – नवी मुंबईतील प्रदूषणाला राजकीय आश्रय? नागरिकांच्या तक्रारींकडे यंत्रणांचे दुर्लक्षच

हेही वाचा – मुंबईच्या राडारोड्याचा भार नवी मुंबईवर

विशेष म्हणजे यात केवळ पोलीस नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही सहभागी होता येणार आहे. ऑनलाईनद्वारे रोज एक टास्क दिले जाणार असून ते पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राहावी यासाठीच हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपायुक्त संजय पाटील यांनी व्यक्त केला. 