अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरात ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत आरोपीने पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. किशोर कोनाळे असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पनवेल : गरजेपोटी घरांबाबतच्या फेरनिर्णयासाठी बैठक

पीडित अल्पवयीन मुलगी ही घराबाहेर तिच्या वयाच्या मैत्रिणीबरोबर खेळत होती. त्या वेळी आरोपीने तिला बोलावले, मात्र ती न आल्याने आरोपीने जबरदस्तीने स्वत:च्या घरात तिला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने आरडाओरडा केल्याने पीडितेचे नातेवाईक धावून आले व तिची सोडवणूक केली. जबरदस्तीने घरात घेऊन जात असताना आरोपीने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse zws