नवी मुंबई पोलिसांनी वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद केली असून त्यांच्या कडून नवीमुंबई मुंबई परिसरातील अनेक गुन्हे उकल झाली आहे. आता पर्यंत त्यांच्या कडून ७० लाखांच्या १३ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोहम्म्द अरशद अमजद अली खान ,अख्तर अमजद अली खान , झाहीद अख्तर अन्सारी ,अब्दुल माजीद मुसाभाई तलाट अशी अटक आरोपींची नावे आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे , खारघर, कामोठे, एन.आर.आय. व सानपाडा पोलीस ठाणे हददीतून मोटार कार चोरी झालेबाबत गुन्हे दाखल झाले होते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : पावसाळ्यात एपीएमसीत पाणी तुंबण्याची शक्यता
या बाबत सीसीटीव्ही तपासणी करत असताना ऑगस्ट महिन्यात चोरी झालेली एक गाडी गेल्या महिन्यात महापे भागात ज्या ठिकाणी पार्क केली तेथेच काही तासांनी त्याच दिवशी खारघर येथून चोरी केलेली गाडी पार्क करीत असताना दिसून आले.या दोन्ही गाड्या मिलनियम बिजनेस पार्क महापे, रबाळे एम. आय. डी. सी अंतर्गत रोड, दिघा, कळवा, कळवा ब्रिज, ठाणे जुपिटर हस्पिटल, मुलूंड चेक नाक, भांडुप पुढे गाव, इस्टन एक्सप्रेस हायवे, कांजूरगाव , विक्रोली, गोदरेज, घाटकोपर पश्चिम, छेडानगर, चुनाभटटी परिसरातील, इंड्रस्टियलऐरीया इत्यादी या ठिकाणी गेल्याचे व तेथे पार्क केल्याचे सतत सहा दिवस सीसीटीव्ही फुटेज पाहुन निष्पन्न झाले.
त्यात या गाड्या चोरणारे ज्या गाडीतून वाहन चोरी करण्यास येत होते त्या मारुती सुझुकी वॅगनर कारही सीसीटीव्हीत आढळून आली. त्याच्या क्रमांकावरून संशयित आरोपीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. याचाच आधार घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे व पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता २३ फेब्रुवारीला आरोपी खारघर परिसरात असल्याचे समोर आले. तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे,यांच्या पथकाने मोहम्म्द अरशद अमजद अली खान व त्याच्या सोबत असलेल्या अख्तर अमजद अली खान यांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहिती वरून झाहीद अख्तर अन्सारी व अब्दुल माजीद मुसाभाई तलाट यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा >>> नवी मुंबई : कामोठे येथे बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई; आरोपींमध्ये चार महिलांचाही समावेश
अटक आरोपी कडुन नवी मुंबई व मुंबई परिसरातून एकूण १५ कार चोरी केल्याचे तपासात समोर आले. त्यांच्या कडून ७० लाखांच्या १३ कार जप्त करण्यात आल्या यात मारुती सुझुकी इरटिंगा -०१, मारुती स्वीप्ट डिजायर कार ०१, मारूती स्वीप्ट कार – ०३, डुदाई ऑरा कार-०२, हुंदाई वेरणा कार – ०१, मारुती सुझुकी वॅगनर कार- ०४, मारूती ईको कार ०१ अशा एकुण १३ कारचा समावेश आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या कारवरील मूळ आरटीओ क्रमांक, इंजिन / चेसीस नंबर नष्ट करून त्यावर अपघातात पूर्णपणे नुकसान झालेल्या कारवरील आरटीओ क्रमांक इंजिन / चेसीस नंबर प्रिंट केल्याचेही उघड झाले आहे. आरोपी कडून ,रबाळे -२ एनआरआय,खारघर -४ , कामोठे-२ कांजूरमार्ग ,मेघवाडी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे उकल झाली