पोलिसांचा व नागरिकांचा जास्तीत जास्त संवाद व्हावा यासाठी पोलिसांनी समाजमाध्यमांचा पुरेपूर चांगला वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच एक भाग म्हणून अजून एक पाऊल पुढे टाकत नवी मुंबई पोलिसांनी ट्विटरवरदेखील खाते सुरू केले आहे. या खात्याचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी करण्यात आले.
आजच्या संगणकांच्या पिढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले व्हॉट्सअप, फेसबुक, वेबसाइट, ई-मेल अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस नेहमीच नागरिकांशी संवाद साधण्यात प्रयत्नशील राहिलेले आहे. ट्विटरवर आता हा संवाद सुरू करण्यात आला आहे. या ट्विटरवर जास्तीत जास्त १४० शब्दांत नागरिक त्यांच्या सूचना, समस्या व माहिती मांडू शकता. एकाच वेळी अनेक समस्यादेखील मांडू शकतात. या ट्विटर खात्यावर येणाऱ्या प्रत्येक समस्या, सूचना माहिती यांची गंभीर दखल घेतली जाणार असून २४ तास या ट्विटर खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा सक्षम कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आले आहे, असे रंजन यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader